ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा. लि.पुणे यांच्यामार्फत गुरुकुल पूर्व प्राथमिक विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा. लि.पुणे यांच्यामार्फत गुरुकुल पूर्व प्राथमिक विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान.



                         मंगळवेढा:आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन, महिला मुक्ती दिन व महिला शिक्षक सन्मान दीन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. 

                        या बालिका दिनाचे औचित्य साधून ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा. लि. पुणे, सकाळ तनिष्का व्यासपीठ यांच्यामार्फत गुरुकुल पूर्व प्राथमिक विद्यालयातील शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. रत्नमाला मर्दा यांच्या हस्ते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा धनश्री मल्टिस्टेटच्या संचालिका मंदाकिनी बिराजदार, संस्थेचे अध्यक्ष दामाजी माळी, सकाळ तनिष्का चे मोहन काळे, ॲग्रीकॉस एक्सपोर्ट चे संचालक अजय अदाटे, प्रशांत तोडकरी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

                       यावेळी गुरुकुल प्रशालेतील विद्यार्थिनी सान्वी शिर्के, प्रगती जाधव, जानवी जाधव, माहेश्वरी नाईकवाडी, वेदिका उन्हाळे, प्राची इंगळे, आदिती घाडगे या व्यक्त विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली होती.

                     त्यानंतर स्वराज हेंबाडे व सान्वी यांनी सावित्रीबाई विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ग्राफिक सकाळचे मोहन ॲग्रीकॉस एक्सपोर्टचे अजय अदाटे यांच्यामार्फत संस्थेचे अध्यक्ष दामाजी माळी व शिक्षिकांचा शालेय भेटवस्तू, देऊन सन्मान करण्यात तसेच गुरुकुल सावित्रीबाईंच्या असणाऱ्या विद्यार्थिनींचा साहित्य देऊन सन्मान आला. यावेळी सकाळ तनिष्काचे मोहन काळे यांनी आपले केले.

                     त्यांनी मनोगतातून गुरुकुल प्रशालेतील विद्यार्थिनींना व बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गुरुकुल प्रशाले तर्फे ॲग्रीकॉस एक्सपोर्टचे अजय आदाटे व सकाळ तनिष्काचे मोहन काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुकुल प्रशालेचे पालक ज्ञानेश्वर जाधव यांनी फळ महोत्सवातील देशी बोर मुलांना उपलब्ध करून दिले त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. तसेच शाळेतील बागेची उत्कृष्ट वाढीसाठी ॲग्रीकॉस एक्सपोर्ट कडून औषधे देण्यात आली. आणि शाळेत लवकरच घरगुती भाजीपाला लागवड तंत्रज्ञान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्याचा सर्व शिक्षक आणि पालकांनी लाभ घ्यावा असा विचार व्यक्त करण्यात आला. 

                  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका वैशाली लेंडवे यांनी केले. तर आभार सहशिक्षिका पल्लवी नागणे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शिर्के यांनी तनिष्का काळे व प्रशालेतील पुष्पगुच्छ आला. प्रशालेतील वेशभूषेत शैक्षणिक करण्यात मनोगत आपल्या शिक्षिकांना मोलाचे परिश्रम लाभले.



test banner