मंगळवेढा तालुका प्राथ. शिक्षक संघ कार्यकारणीची मा. गटशिक्षणाधिकारी यांचेसोबत बैठक संपन्न - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

मंगळवेढा तालुका प्राथ. शिक्षक संघ कार्यकारणीची मा. गटशिक्षणाधिकारी यांचेसोबत बैठक संपन्न



  मंगळवेढा तालुका शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारणी मंडळाची  मा. गटशिक्षणाधिकारी यांचे सोबत विविध मागण्या व शिक्षकांच्या  प्रलंबित प्रश्नाबाबत बैठक पं.स.मंगळवेढा येथे  संपन्न झाली. 

        यावेळी गटशिक्षणाधिकारी मा श्री पोपटराव लवटे साहेब यांना जिल्हा स्काऊट गाईड कडून आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक संघाच्या वतीने यथोचित सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

    सरचिटणीस राजेंद्र केदार यांनी प्रास्ताविक करून नूतन कार्यकारिणी मंडळाची ओळख करून दिली आणि बैठक घेण्याचे प्रयोजन सांगितले. 

    अध्यक्ष संभाजी तानगावडे यांनी शिक्षक संघाचे वतीने निवेदन देवून त्यातील २६ मागण्या व प्रलंबित प्रश्न मांडले. त्यावर एकेका प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक मागणीवर चर्चा करत असताना गटशिक्षणाधिकारी  मा.पोपटराव लवटे साहेब, विस्तार अधिकारी मा.रणदिवे साहेब, विस्तार अधिकारी मा.आनंदपुरे साहेब, लेखनिक संतोष मोरे यांनी प्रशासकीय भूमिका मांडली आणि वेळेत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले जातील असे सांगितले. 



     यावेळी राज्य सरचिटणीस (नपा) मा.संजय चेळेकर यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आग्रही भूमिका मांडून विनाविलंब प्रश्नांची सोडवणूक व्हावी, शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजन करावे, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करावे आदि मागण्याबाबत चर्चा केली तर कार्यकारी अध्यक्ष कविराज दत्तू यांनी जुनी पेन्शन बांधवांना चटोपाध्याय वेतनश्रेणी व फरक तात्काळ अदा करावे, शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केलेल्या शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी द्यावी अशी मागणी केली. 



   गटशिक्षणाधिकारी मा. पोपटराव लवटे  यांनी सर्व मागण्या व प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावू तसेच जानेवारी महिन्यात सेवापुस्तके अपडेट करण्यासाठी कॅम्प लावू, कार्यालयीन लेखनिक यांचे जॉब चार्ट लावू, आदर्श पुरस्कार वितरण घेवू यासह सर्वच मागण्यावर सविस्तर चर्चा केली. सकाळी ११:३० वाजता सुरू झालेली बैठक सुमारे तीन तास सविस्तर चर्चा होवून संपन्न झाली. 


    लेखनिक श्री संतोष मोरे यांनी इतिवृत्त लेखन केले तर विस्तार अधिकारी मा. बिभिषण रणदिवे साहेब यांनी आभार व्यक्त केले. 

   यावेळी शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष नागेशकुमार धनवे,  कोषाध्यक्ष सखाराम सावंत,  प्रवक्ते सिध्देश्वर मेटकरी,  उपाध्यक्ष गोपाळ लेंडवे,  सहचिटणीस राजशेखर कोष्टी, जिल्हा उपाध्यक्ष विष्णू आसबे, तालुका संघटक राजू रायबान, शिवाजी नकाते आदि कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

test banner