श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात दिले योगासनाचे धडे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात दिले योगासनाचे धडे.

 


              प्रतिनिधी:-श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या मौजे फटेवाडी येथे सुरू असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबीरात योगगुरू संतोष दुधाळ यांनी प्रात्यक्षिकातून योगासनाचे धडे दिले.

             मानवी जीवनात योग व आहाराचे खूप महत्त्व आहे असे सांगून मयुरासनाचे व ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी प्रथम नागरिक सीमाताई काळुंगे,पोलीस पाटील सुरेश वाडदेकर,चंद्रकांत लेंडवे,दत्तात्रय चव्हाण,उद्योजक प्रकाश काळुंगे,शिवाजी माने यांचेसह फटेवाडी ग्रामस्थ,महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेश गावकरे,प्रा शैलेंद्र मंगळवेढेकर,प्रा संजय क्षिरसागर,प्रा प्रशांत धनवे,प्रा एस के राठोड,प्रा समाधान नागणे,प्रा बाळकृष्ण माळी,प्रा आनंद साळवे,प्रा बापू इंगळे,प्रा एस एन पवार,प्रा दादासाहेब देवकर उपस्थित होते.  

              सदर कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे १३६ स्वयंसेवक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा शैलेंद्र मंगळवेढेकर यांनी केले तर आभार स्वयंसेविका कोमल बनसोडे हिने मानले.


test banner