मुंबईच्या आंदोलनासाठी मंगळवेढ्यातून मराठा बांधव रवाना. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २० जानेवारी, २०२४

मुंबईच्या आंदोलनासाठी मंगळवेढ्यातून मराठा बांधव रवाना.

 


              मंगळवेढा:मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला होणाऱ्या आंदोलनासाठी मंगळवेढा तालुका व शहरातून हजारो बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.

              मंगळवेढ्यातील शिवप्रेमी चौकातील शिवालयातून प्रस्थान झाले प्रारंभी शिवमूर्तीचे पूजन करुन पंढरपूर-टेंभुर्णी मार्गे मराठा समाज मुंबईकडे कुच करणार आहेत.


               सहभागी होणाऱ्या बांधवांनी येताना आपल्या गाडीला भगवा ध्वज लावला होता एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा देत मुंबईकडे रवाना झाले.

               आपल्या लेकराबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बहुसंख्येने मराठा बांधव उपस्थित होते.आंदोलन भरपूर दिवस चालण्याची शक्यता असल्यामुळे जास्तीत जास्त मराठा बांधवांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल मराठा समाज‌ मंगळवेढा शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले.



test banner