मनसेचे शहराध्यक्ष राजवीर हजारे यांची नगरपरिषद कडे मंगळवेढा शहरातील गटारी अंडर ग्राउंड करण्याची मागणी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २१ जानेवारी, २०२४

मनसेचे शहराध्यक्ष राजवीर हजारे यांची नगरपरिषद कडे मंगळवेढा शहरातील गटारी अंडर ग्राउंड करण्याची मागणी.

             


                     मंगळवेढा:महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा ही मंगळवेढा शहर विकासासाठी अग्रेसर असते म्हणूनच अजून एक मागणी करतोय की मनसे शहराध्यक्ष- राजवीर हजारे यांच्या माध्यमातून सन 2020-21 साली एक पत्र दिले होते.

                    नगरपालिकेला ते पत्र या गटारी अंडरग्राउंड करण्याबाबतच होते परंतु अजून पर्यंत त्यावर कोणतेही काम किंवा मंजुरी मिळाली नव्हती म्हणून मी अजून एक पत्र 29.12.2023 ला दिले असून माझी अशी मागणी आहे की संपूर्ण मंगळवेढा शहर हद्दीतील सर्व नगरपालिकेच्या गटारी ह्या बाकी इतर शहरांसारख्या अंडरग्राउंड झाल्या पाहिजेत जेणेकरून जो रोजचा रस्त्यावरील कचरा त्या गटारीत जाऊन पडतो त्यामुळेच अंडरग्राउंड गटारी झाल्या तर तो कचरा गटारीत पडणार नाही.




                     आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे गटार करणारे कामगार आहेत त्यांचेही काम कमी होईल आणि नगरपालिकेचाही गटारीवरील खर्च कमी होईल आणि सर्व  शहरातील सांडपाणी व्यवस्थितपणे शहराच्या बाहेर जाईल आता ज्या गटारी आहेत त्या गटारी अशा अवस्थेत आहेत त्या गटारीत सांडपाणी जे आहे ते पूर्णपणे स्थिर असते ते कुठेही असं खळखळ असं वाहत नाही त्यामुळे होणारा नागरिकांना त्रास आणि नागरिकांचे आरोग्य कायमच धोक्यात येत असून त्यावर अति तातडीने उपाय म्हणजे अंडरग्राउंड गटार नाहीतर मलेरिया डेंगू टायफाईड असे रुग्ण कायमच होत राहतील.

                     त्यामुळे अंडरग्राउंड गटार होणे अति महत्त्वाचे असून यावर नगरपालिकेने तातडीने लक्ष घालून संपूर्ण मंगळवेढ्याच्या विकासाचे एक पाऊल पुढं घेऊन जावं हीच एक अशा अपेक्षा असून माझी कळकळीची विनंती देखील आहे की नगरपालिकेने यावर लवकरात लवकर ठराव करून मंजूर करून घ्यावे ही नम्र विनंती.



test banner