मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.



               आज ३ जानेवारी २०२४ रोजी मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यालयात सावित्री बाई फुले यांची 193 वी जयंती साजरी केली.

               यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष राजाभाऊ चेळेकर यांनी प्रास्ताविक केले आणि प्रा. बलभीम शिवशरण यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा उजाळा दिला ते म्हणाले की आता च्या आधुनिक युगात स्त्री शिक्षण ची दारे सावित्री बाई फुले यांच्या मुळे उघडल्या गेल्या आहेत. 

               प्रा.अकबर मुलाणी यांनी स्री शिक्षण,विधवा पुनर्विवाह यावर विचार व्यक्त केले.

               कृषीतज्ञ अजय आदाटे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की आजच्या डिजिटल युगात स्त्री शिक्षणा मुळे त्यांना विविध प्रकारच्या क्षेत्रात कार्यरत राहत आहेत. महात्मा फुले यांच्या कार्यात त्यांनी मोलाचा सहभाग घेतला.

               आजचा स्त्री मुक्ती सन्मान कार्यक्रम मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रशांत साळे यांच्या अध्यक्षेखाली आणि  मारुती बापू वाकडे, दिलीप जाधव, भीमराव मोरे मुबारक शेख, दादासो पवार ॲड. रविकिरण कोळेकर, नाथा आयवळे, सुनीता अवघडे, फारुक मुजावर, सत्तार इनामदार, संदीप पवार, लक्ष्मण अवघडे, राजन ठेंगील मोहन काळे, बापू अवघडे, ओम मुरडे आदी उपस्थित होते. आभार मनोज माळी यांनी मानले.

- मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटी.




test banner