मंगळवेढा: जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षणा संदर्भात जागृती झाली असताना व महाराष्ट्रभर कुणबी नोंदी तपासणीचे काम वेगात चालू असताना देखील मंगळवेढा तालुक्यातील मोडी लिपिक वाचक नसल्यामुळे तहसील कार्यालय,शिक्षण मंडळ नगरपरिषद,भूमी अभिलेख व पंचायत समिती शिक्षण विभाग यामध्ये ज्या नोंदी घावलेले आहेत त्या मोडीवाचक नसल्यामुळे कोणतीही कारवाई त्यावरती होत नाही त्यामुळे मराठा समाजाचे फार मोठे नुकसान यामधून होत आहे.
तरी प्रशासनाने त्वरित मोडी लिपी वाचकाची व्यवस्था करावी व मोडी लिपीतील नोंदी त्वरित तपासून त्याचा पाठपुरावा करावा यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
त्याची दखल त्वरित न घेतल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येईल व आंदोलनाचा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला यावेळी नंदकुमार पवार मुरलीधर घुले,दत्तात्रय भोसले,प्रकाश मुळीक,सतीश दत्तू ,प्रफुल्ल सोमदळे,फिरोज मुलानी, बबन रोकडे,हनुमंत नाईकवाडी उपस्थित होते.