मंगळवेढा:विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या शाहिद शेख याची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या इंदोर येथे होणाऱ्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेसाठी बॅडमिंटन संघात निवड झाली आहे.
सदरच्या निवडीबद्दल शाहिद शेख याचा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ एन बी पवार यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक, प्रा गणेश जोरवर,प्रा विजय दत्तू यांचे शाहिदला मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड, डॉ संजय शिवशरण,प्रा. डॉ डी एस गायकवाड तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.