मंगळवेढा:मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा शहरांमध्ये साखळी उपोषण सुरू आहे.त्याठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सकल मराठा समाजाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
आरक्षणाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठा समाजास लवकरच सरसकट आरक्षण मिळावे अशी भूमिका यावेळी समाजाच्या वतीने घेण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.