मंगळवेढा:मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला लवकरच आरक्षण मिळावे यासाठी जय जवान मंडळच्या वतीने छत्रपती शिवरायांना साकडे घालण्यासाठी १६ डिसेंबर रोजी रायगडला प्रस्थान करण्यात आले.
अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात उपोषणे आंदोलने सुरू आहेत त्याच धर्तीवर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी जय जवान मंडळाचे सदस्य रायगडवरती छत्रपती शिवरायांना साकडे घालणार आहेत.
यावेळी मंगळवेढा येथील शिवालय शिवप्रेमी चौक या ठिकाणाहून प्रस्थान करण्यात आले. यावेळी मंडळाच्या विद्या गुंगे,विजया गुंगे,सुजाता कसगावडे,जस्मिन मुजावर,रुकसाना मुजावर,राजाबाई घुलेसंगीता देशमुख,सुनिता पाटील,दमयंती कसगावडे,फुलाताई कसगावडे,अनिता कसगावडे सुनीता पवार,राधिका कसगावडे,मेघा सरवळे सुनीता कसगावडे,नंदिनी आवताडे,दिपाली पवार,तेजस्वी पवार,अलका मुरडे,हिराबाई चव्हाण,साक्षी मोरे,सविता घाडगे,अनजुम मुजावर,उज्वला दत्तू,सोनाली दत्तू,सुरेखा दत्तू राजश्री दत्तू,भाग्यश्री दत्तू, मनीषा दत्तू,अर्चना उन्हाळे, वैष्णवी उन्हाळे, प्रतीक्षा दत्तू, सुवर्णा दत्तू,शोभा दत्तू,नम्रता दत्तू,उज्ज्वला गणेशाकर,जयश्री दत्तू , सारिका दत्तू,रुक्मिणी वाकडे उपस्थित होत्या.