सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी, आयुष्यात उपयोगी पडतील त्यांचे हे विचार! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी, आयुष्यात उपयोगी पडतील त्यांचे हे विचार!

 


आज सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी, आयुष्यात उपयोगी पडतील त्यांचे हे विचार!


Sardar Vallabhbhai Patel: आज सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी, आयुष्यात उपयोगी पडतील त्यांचे हे विचार!


Sardar Vallabhbhai Patel: आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी आहे.स्वातंत्र्य लढ्याला वेग आला असताना पटेलांनीही महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. जाणून घेऊया त्यांचे अनमोल विचार...


Sardar Vallabhbhai Patel: सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची आज 72 वी पुण्यतिथी आहे. सरदार पटेल यांनी 15 डिसेंबर 1950 रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. सरदार पटेल यांना जग स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान म्हणून ओळखते. यासोबतच सरदार पटेल गृह, माहिती आणि राज्य खात्याचे मंत्रीही झाले. सरदार पटेल यांची आठवण अनेक कारणांनी होत असली, तरी त्यामध्ये सर्वांत ठळक कारण म्हणजे स्वतंत्र भारताला एकत्र आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका. सरदार पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील खेडा जिल्ह्यात झाला, तर 15 डिसेंबर 1950 रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. गृहमंत्री असताना त्यांनी देशातील सुमारे 562 लहान-मोठ्या संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले होते. असे करून त्यांनी भारतीय एकात्मता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.


सरदार वल्लभभाई पटेल यांना नव्या भारताचे निर्माते देखील म्हटले जाते आणि त्यांनी केलेल्या धाडसी कार्यामुळेच त्यांना लोहपुरुष आणि सरदार ही पदवी मिळाली. सरदार पटेल स्वभावाने शांत, उदार आणि कोमल मनाचे होते, परंतु ते महान आणि प्रेरणादायी विचारांचे धनी मानले जातात. आज, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, तुम्ही लोहपुरुषाचे हे 10 महान विचार तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता.


(१) आज आपण उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, जात-पात हा भेदभाव संपवला पाहिजे.


(२) या मातीत काही तरी वेगळे आहे. अनेक अडथळे असुनही येथे महान आत्मांचा निवास राहिला आहे.


(३) कठीण प्रसंगी, भ्याड लोक निमित्त शोधतात, तर धाडसी लोक या परिस्थितीतून मार्ग काढतात.


(४) सामायिक प्रयत्नाने आपण देशाला एका नव्या महानतेकडे नेऊ शकतो, तर एकात्मतेचा अभाव आपल्याला नव्या संकटांकडे घेऊन जातो.


(५) शक्ती नसताना विश्वास निरुपयोगी आहे. कोणतेही महान कार्य करण्यासाठी विश्वास आणि शक्ती या दोन्ही आवश्यक असतात.


(६) तुमचा चांगुलपणा तुमच्या मार्गात बाधक आहे, म्हणून तुमचे डोळे क्रोधाने लाल होऊ द्या आणि कठोर हातांनी अन्यायाचा सामना करा.


(७) जोपर्यंत माणसातील मूल जिवंत असते, तोपर्यंत त्याच्यापासून अंधकारमय निराशेची सावली दूर राहते.


(८) तुमचा अपमान सहन करण्याची कला तुम्हाला अवगत असावी.


(९) शांततेवर जाणीवपूर्वक संस्कृती निर्माण केली जाते. मरायचे असेल तर ते आपल्या पापांनी मरतील. 

जे काम प्रेमाने, शांतीने केले जाते ते शत्रुत्वाने होत नाही.


(१०) जीवनाचा धागा देवाच्या हातात आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखे काहीही नाही.

अजय आदाटे,

कृषीतज्ञ मंगळवेढा.



test banner