स्व. शरद जोशी साहेब सांगायचे की, ' देशातल्या बाजारपेठांची स्थिती काहीही असो, पुरेसा पुरवठा असो नसो, निर्यातीची संधी उपलब्ध असली पाहिजे. निर्यातीत अडथळे आणणाऱ्यांना देशद्रोही म्हटले पाहिजे... - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

स्व. शरद जोशी साहेब सांगायचे की, ' देशातल्या बाजारपेठांची स्थिती काहीही असो, पुरेसा पुरवठा असो नसो, निर्यातीची संधी उपलब्ध असली पाहिजे. निर्यातीत अडथळे आणणाऱ्यांना देशद्रोही म्हटले पाहिजे...



स्व. शरद जोशी साहेब सांगायचे की, ' शेतमाल निर्यात म्हणजे काही पाण्याच्या नळाची तोटी नाही, उघडली की वाहायला लागले आणि बंद केले की थांबले. देशातल्या बाजारपेठांची स्थिती काहीही असो, पुरेसा पुरवठा असो नसो, निर्यातीची संधी उपलब्ध असली पाहिजे. निर्यातीत अडथळे आणणाऱ्यांना देशद्रोही म्हटले पाहिजे

आज १२ डिसेंबर 
आज शेतकरी नेते शरद जोशी यांचा स्मृती दीन.

 जन्म. ३ सप्टेंबर १९३५ सातारा येथे.

शेतकऱयांच्या प्रश्नावर लढणारे झुंझार नेते म्हणून शरद अनंत जोशी यांची ओळख होती. शरद जोशी यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावला झाले तर मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमधून त्यांनी एम.कॉम केले. बँकिंग या विषयासाठी त्यांना सी. रँडी सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. त्यांचे मूलभूत कार्य शेती व शेतक-यांचे प्रश्न याभोवती फिरत राहिले जे १९७७ पासून अव्याहत सुरू होते.  १९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि तेव्हापासून शेतमालास रास्त भावया एककलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व केले. शरद जोशींचे सर्वात मोठे यश म्हणजे शेतकरी तितका एक एकहा नारा देऊन त्यांनी शेतकरी समाजाला जात, धर्म, प्रांत, भाषा हे भेद विसरायला शिकवलं होतं. १९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि तेव्हापासून शेतमालास रास्त भावया एककलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व केले. त्यासाठी वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने असे मार्ग त्यांनी निरंतर सुरू ठेवले.


शेतकरी आंदोलन महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी देशभरातील शेतकर्यांदच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना ३१ ऑक्टोंबर १९८२ रोजी केली आणि महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने उभारली.

चांदवड (जि.नाशिक) येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन भरवले ज्यामध्ये सुमारे दोन लाख महिला उपस्थित होत्या.

शरद जोशी यांनी स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी १९९४ साली  स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. देशाची राजकीय,आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता सांगताना त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना कोणतीही लालूच न दाखविणारा किंबहुना मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा जोशी यांनी मांडला.



शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक वारकरीचे ते संपादक व प्रमुख लेखक होते. तिसर्या  जगातील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा विचार म्हणून शरद जोशींचा विचार व त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी, अनेक विदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशींनी मार्गदर्शन केले. १९८० साली नाशकात कांदा आणि ऊस दराप्रश्नी शेतकरी संघटनेला घेऊन ते रस्त्यावर उतरले आणि शरद जोशी हे नाव घराघरात पोहोचले. शरद जोशी हे २००४ ते २०१० या काळात राज्यसभेचे सदस्य होते.   शेतकऱ्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला असून, शेतकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. शरद जोशी यांचे अंगारवाटा ... शोध शरद जोशींचाया नावाचे चरित्र भानू काळे यांनी लिहिले आहे.  शरद जोशी यांचे १२ डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले.

शरद जोशी सांगायचे शेतकऱ्याला एखाद्या वेळी दारूचा किंवा बाईचा नाद असेल तरी परवडेल पण ह्या नादान पुढाऱ्यांच्या नादी लागु नका. शेतकऱ्याला दारूचा किंवा बाईचा नाद असेल तर त्याच्या एकट्याच्या संसाराच वाटोळं होत पण पुढाऱ्यांच्या नादी लागला तर संपूर्ण शेतकरी समाजाच नुकसान होत.



आता शेतकरी समाजाने बदललेच पाहिजे

=========================

१. आता ती मंदिरे पुष्कळ आहेत. नवीन मंदिरं उभारणी बंद करा. वर्गणी देऊ नका. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटूंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.

२. दिंड्या, वा-या, सप्ताह यात सहभागी होऊन पापमुक्ती व मोक्षप्राप्ती नादात व्यक्ती प्रगतीचे (वेळ-पैसा-श्रम) चक्रच मारून टाकतो. पैसा व बुध्दीचा अपव्यय होतो. कर्मातच देव आहे यावर विश्र्वास ठेवा. (भक्त पुंडलिक)

३. 'माणूस सोबत काहीच घेउन जात नाही'. हे सांगण्यासाठी बुवा २०,०००रू घेतो. अशा बाबांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा.

४. शेतीतील, कुटूंबातील, गावकूसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.

५. कुटूंबातील सदस्यावर सर्वात जास्त प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दू:खात तेच तुमची  जास्त काळजी घेणारे आहेत.

 

६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा. आणि एकमेकानां व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा.

७. आपण  सर्व जाती-धर्मांचा आदर करा. जातीवादाचे पाप आपण तरी करू नका. धर्मांधांच्या नादी लागु नका.

८. मोडेल पण वाकणार नाही. या स्वभावात बदल करा. काळ खूप बदललाय याचे भान असू द्या. (महापुरे मोठी झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती)

९. राजकारण व राजकारणी यांचा नाद सोडा. या दोहोमुळे समाजाचे खूप मोठे नूकसान झालेय. आता बदला म्हणजे पुढच्या अनेक पिढ्याचे कल्याण होईल. यांचा फक्त मत "दान" पुरताच विचार करा.

 १०. कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात/नोकरीत/व्यवसायात राहा. किमान ८ तास काम कराच (कुठल्याही क्षेत्रात).



११. खेकडा व्रत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा (एकमेका साह्य करा).

१२. नियोजन व काटकसरीने (आहे त्या उत्पन्नात) जीवन जगा. भोगवादाच्या नादात कर्जबाजारी होऊच नका.

१३. यात्रा, जत्रा, सत्यनारायण, वास्तुशांती, जागरणगोंधळ, डोहाळे(ओटीभरण), पाचवी, बारसे, वाढदिवस मर्यादीतच ठेवा.

१४. भांडकुदळ, लबाड, पैसे बुडवणाऱ्याच्या पासुन लांब रहा. मदत करणाराचे कायमच ऋणी रहा.

१५. घरातील महीलांना मानाची  वागणूक द्या. मुलींना उच्च शिक्षित करा.

१६. महिलांना मंदिरं, उपासना, कर्मकांड यातून बाहेर काढा आणि व्यापारी, उद्बोधन वर्गाला न्या. त्यांच्या हातातील पोथ्या-पुराणांची संख्या कमी करा व इतिहास, विज्ञानाची पुस्तक हातात द्या.

१७. कर्मकांड करणे टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.

१८. आपण कमविलेल्या पैश्यातुनच आपल्या कुटुंबाला  खुश ठेवा.

 

शेतकऱ्यांना घामाचा दाम मिळाला पाहिजे यासाठी आयुष्य वेचणारे शरद जोशी साहेबांची आज पूण्यतिथी....

 

शेतकरी चळवळीसाठी आपलं स्थिर संपन्न आयुष्य सोडून आंदोलन उभा करणाऱ्या शरद जोशी साहेब यांना विनम्र अभिवादन.

अजय आदाटे कृषीतज्ञ 



test banner