अखेर मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाला स्थगिती,या तारखेपर्यंत दिला वेळ. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

अखेर मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाला स्थगिती,या तारखेपर्यंत दिला वेळ.

 


                  महाराष्ट्र:राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आरक्षणासाठी वेळ मागितला आसता पाटील म्हणाले की राज्य सरकारच्या शिष्ट मंडळाने थोडा वेळ मागितला आहे,काही हरकत नाही त्यांना थोडा वेळ देऊ आत्तापर्यंत 40 वर्ष वेळ दिला आहे आता अजून थोडा देऊ,पण आरक्षणाचा आंदोलन  थांबणार नाही,आता दिलेला वेळ हा शेवटचाच असणार आहे.

                 सरकारला 2 जानेवारी पर्यंत वेळ देत आहोत असे म्हणून जरांगे पाटील यांनी 9 दिवस सुरू असलेले उपोषण तूर्तास मागे घेण्यात आलेले आहे.        

                  ते पुढे बोलताना म्हणाले की हे महाराष्ट्रातील मराठ्यांना विशेष सांगतोय की सरकार मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार आहे.पुढे बोलताना ते असे म्हणले की हे दिवाळी सर्वांना गोड झाली पाहिजे अर्धवट आरक्षणाचा निर्णय झाला असता तर आपला एक भाऊ नाराज झाला असता तर दुसरा खुश झाला असता.दिवाळी सर्वांना गोड करायची आहे. एकाला गोड आणि दुसऱ्याला कडू मी या मताचा नाही.

                  ओबीसींच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे.विविध निकष ठरविण्यासाठी काम मोठ्ठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांना कायदेशीर बाजू समजावून सांगण्यात आल्या.

                  याप्रसंगी निवृत्त न्यायमूर्ती एम.जे.गायकवाड व सुनील शुक्रे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली. त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत,धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.


test banner