मंगळवेढा:अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांना माजी न्यायमूर्ती गायकवाड समितीचे सदस्य व शासनाचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर पाटील यांनी शासनाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सदर कालावधीत शासनाने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे यासाठी मंगळवेढा येथे १ डिसेंबर पासून साखळी उपोषणास सुरुवात होणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येकी तीन गावे व शहरातील एक गल्ली दररोज दामाजी चौक येथे उपोषणास बसणार आहे तरी जास्तीत जास्त सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.