महाराष्ट्र राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी मारापूरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांची निवड - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३

महाराष्ट्र राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी मारापूरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांची निवड


            

                           मंगळवेढा:महाराष्ट्र राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी मारापुर गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

                          अहमदनगर येथे पार पडलेल्या  महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा कार्यकारणीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रतील सर्व जिल्ह्यामधील जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या त्यावेळी विनायक यादव यांना संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील यांनी याबाबतचे निवडीचे पत्र दिले.

                           ग्रामपंचायत पातळीवरती कामाचा चढता आलेख पाहून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीनंतर बोलताना ते म्हणाले की सरपंच सेवा संघ संघटनेमार्फत तालुक्यातील सरपंचांना एकजूट करून त्यांच्या व जनतेच्या अडचणी सोडविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.

                           या निवडी नंतर आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते सरपंच विनायक यादव यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी उद्योजक संजय आवताडे,पो.नी.मनोज यादव,राजकुमार यादव,उपसरपंच अशोक आसबे आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.test banner