टीम संवाद न्यूज
बोराळे येथे जि.प.सदस्य श्री नितीन नकाते, श्री बबन भोजने साहेब व श्री विठ्ठल मंदिर समिती यांनी सत्काराचे आयोजन केले होते.
याप्रसंगी दामाजीचे चेअरमन श्री विष्णू आसबे,व्हाईस चेअरमन श्री धनाजी नागणे व तालुका सोसायटीचे नुतन संचालक श्री सिद्धेश्वर सावत,श्री काशिनाथ लिगाडे, श्री संदीप धुमाळे, श्री दिलीप गडदे व नुतन केंद्र प्रमुख श्री चं.तु.पाटील तसेच शिक्षक संघ नुतन कार्यकारणी पदाधिकारी यांचा सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी न.पा,म.न.पा शिक्षक संघाचे राज्याचे सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा शिक्षक सोसायटीचे मा.चेअरमन,संचालक संजय चेळेकर सर यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षक संघ कोणताही जातीभेद न करता फक्त शिक्षक हिताचे काम करतो तसेच शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिलेदार अगोदर शिक्षक कर्तव्ये पार पाडुन शिक्षक हितासाठी अहोराञ कार्यरत असतो हे अधोरेखीत केले.
त्यांनी बोलताना आयोजक,बोराळे ग्रामस्त,विठ्ठल मंदिर कमिटीचे आभार ही मानले.जि.प सदस्य नितीन नकाते यांनीही मनोगतातुन जि.प. शाळांची गुणवत्ता खाजगी शाळापेक्षा अव्वल असल्याचे नमुद केले, या सत्कार समारंभ प्रसंगी मा.सरपंच तानाजी धनवे,युवानेते सचिन नकाते,बबन भोजने साहेब,दयानंद भोजने,तानाजी जाधव,गणेश धनवे,दत्ताञय धनवे,मारुती चौगुले गुरुजी,पांडुरंग कुलकर्णी गुरुजी,राजु बनसोडे गुरुजी,अरुण भोजने,प्रकाश भोजने,पांडुरंग धनवे,संजय धनवे,मोहन भोसले सर,सावकर मुंगसे,मोहन धनवे,प्रभाकर धनवे यासह शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष श्री नागेशकुमार धनवे, कार्यकारी अध्यक्ष श्री कविराज दत्तू शिक्षक संंघाचे दामाजी सोसायटीचे माजी चेअरमन श्री सखाराम सावंत, सचिव मोहन लेंडवे,निवास माळी,पंडीत आठवले, दादासाहेब घोडके,बंडू शेख गुरूजी व अनेक ग्रामस्त आणि बोराळे परीसरातील शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री शिवाजी नकाते यांनी केले