श्री संत दामाजी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा.



                     मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे पूजन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला सुरवातीस मुंबई हल्यात शहिद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

                   यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ एन बी पवार म्हणाले की,आपण सर्वजण हक्कासाठी जागृत आहोत पण,देशाच्या हितासाठी,प्रगतीसाठी आपली काही कर्तव्येही आहेत. 

           


                  याची जाणीव व्हावी व त्यानुसार आपली कर्तव्येही पार पाडावीत असे सांगुन संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायीक वाचन करण्यात आले यावेळी उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

               प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रा डॉ संजय क्षीरसागर यांनी केले,सूत्रसंचालन प्रा डॉ राजकुमार पवार यांनी केले तर प्रा डॉ डी एस गायकवाड यांनी आभार मानले.



test banner