आरक्षण मिळे पर्यंत माघार नाही,मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडली. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३

आरक्षण मिळे पर्यंत माघार नाही,मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडली.

     


                     मंगळवेढा:मराठा समाजाला आरक्षण अंतिम टप्प्यात आला आहे समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा लढा लढला पाहिजे दरबारी आहे.

                     आता कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहिल, असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

                     मंगळवेढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. प्रारंभी संत दामाजी चौकात मनोज जरांगे पाटील यांच्यावर  करण्यात आली.

                   जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की मराठा समाजात अनेक गोरगरीब लोक आहेत. सरकारने आता आरक्षणाचा प्रश्न सोडवावा समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.त्यासाठी मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागरूक राहिले पाहिजे.


                 आरक्षणाचा प्रश्न हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आहे. समाजात दुफळी निर्माण होणार नाही.यासाठी समाजातील प्रत्येकानी लक्ष द्यावे,आवाहनही केले.

                  पुढे बोलताना ते म्हणाले की मी सर्व पक्षांना विनंती करतो,सगळे एक व्हा,मराठ्यांना तसेच मराठा समाजाला आरक्षण द्या.मी कोणत्या नेत्यांसोबत चर्चा केली,कुणी काय आश्वासन दिले,हे माझ्या लक्षात राहत नाही.रात्रीतून मंत्री बदलतात.त्यांचे मतभेद जुळत नसताना जुळवून घेतात.त्यामुळे आपल्यातील मतभेद दूर ठेवा,असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे.

                 मंगळवेढा येथील सभेला तुफान गर्दी.

                आज झालेल्या मंगळवेढा येथील सभेला पंढरपूर, सांगोला येथील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                दरम्यान,मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी सरकार एखादा डाव करण्याची शक्यता आहे.आपल्यात गट पाडू शकतात.त्यामुळे सावध रहा असा खळबळजनक दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.आपल्याला शांततेत आंदोलन करायचा आहे.जाळपोळ उद्रेक होऊ देऊ नका, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.

             तुम्ही संविधानिक पदावर बसलेले आहात.राज्य शांततेत राहावे,कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये,ही तुमची जबाबदारी आहे.ते सोडून तुम्ही आता कार्यकर्त्यांना उद्योग सांगायला लागले का?सभा होऊ देऊ नका वगेरे.मी आता त्यावर काही बोलणार नाही. वेळ आल्यावर त्यावर नक्की बोलेन.

             तुम्ही मराठा समाजाची मन दुखावायला लागले आहात.आमच्या समाजाने कधीही तुमचा द्वेष केला नाही.तुम्हाला कायम मान- सन्मान,प्रतिष्ठा देत राहिला आहे.आमच्या समाजाने कधीही तुमच्याकडे या जातीचा त्या जातीचा म्हणून पाहिले नाही.

    ओ. बी. सी. समाजातील नेत्यांवर आमचा मराठा समाज पिढ्यान पिढ्या गुलाल टाकत आलेला आहे.आज आमची पोर अडचणीत आहेत,तर तुम्ही म्हणता ओबीसी मध्ये येऊ नका.आरक्षण खालच घ्या वरच घ्या,असे सांगता,असा सवाल ही मनोज जरांगे पाटील यांनी केला.


test banner