मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती क्रीडा स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण तर एक रौप्य पदक मिळवून मोठे यश संपादन करून यशाचा आलेख चढता ठेवला आहे.
यामध्ये महाविद्यालयाचा खेळाडू उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने प्रथम क्रमांक पटकाविला तर बिरुदेव बनसोडे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला त्याचबरोबर ग्रीको रोमन स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या बालाजी मळगे यांने प्रथम क्रमांक पटकाविला सदर यश संपादन करण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा गणेश जोरवर,प्रा विजय दत्तू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ एन बी पवार,उपप्राचार्य सदाशिव कोकरे तसेच पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापकांनी सर्वांचे अभिनंदन केले.