मंगळवेढा :श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयातील बी ए भाग २ मधील उत्कर्ष संजय क्षीरसागर व बी कॅाम भाग ३ मधील अर्पिता अनिल लाड यांनी जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अणदूर,ता तुळजापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेमध्ये ७५०० रूपयाचे पारितोषिक व सन्मानचिन्ह मिळवून उज्ज्वल यश संपादन केले यासाठी संघ व्यवस्थापक सांस्कृतिक विभागाचे सदस्य प्रा डॉ संजय क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर यशाबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ एन बी पवार यांच्या हस्ते व उपप्राचार्य सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्राचार्य डॉ पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश सहजासहजी मिळालेले नसून त्यांनी अपार कष्ट व मेहनत घेतली आहे.
त्याचेच हे फळ आहे यापुढेही त्यांनी अशीच कामगिरी करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घालावी असे आवाहन करून त्यांनी अभिनंदन केले मिळालेल्या यशाबद्दल श्री विद्या विकास मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले याप्रसंगी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ राजकुमार पवार यांनी करून आभार मानले.