श्री संत दामाजी महाविद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी.




                     श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व क्रीडा विभागाच्या वतीने दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    

                 याप्रसंगी संस्थेचे सचिव किसनराव गवळी व प्राचार्य डॉ एन बी पवार यांच्या यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले यावेळी उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे व प्रा राजेंद्र गायकवाड उपस्थित होते दहीहंडीच्या उत्सवात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     
              हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ राजकुमार पवार, कनिष्ठ विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा धनाजी गवळी शारीरिक शिक्षण संचालक प्रा गणेश जोरवर तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

test banner