उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली,कार्यकर्त्यांना मध्ये चिंतेचे वातावरण,उपोषणस्थळी सलाईन,आता तरी सरकारचे डोळे उघडणार का? - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३

उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली,कार्यकर्त्यांना मध्ये चिंतेचे वातावरण,उपोषणस्थळी सलाईन,आता तरी सरकारचे डोळे उघडणार का?

         


                      मराठा आरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत.आज त्यांचा उपोषणाचा 9 वा दिवस असून आज 9 व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे.

       तरी ही ते आपल्या आंदोलना वरती ठाम आहेत.काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडायचं नाही असा पण त्यांनी केला आहे.त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा कार्यकर्त्यांना मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

               


   आरक्षणा वरती लवकरात लवकर तोडगा काढून जरांगे पाटील यांना वाचवावे असे आवाहन मराठा आंदोलकांनी केले.

       जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज 9 वा दिवस ते अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत.


                     त्यांची प्रकृती खालावली आहे.अंगात ताकद राहिली नसल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले.त्यामुळे त्यांना जागीच सलाईन लावण्यात आली आहे.

        पहाटेच्या सुमारास त्यांना सलाईन लावण्यात आली.अनेक कार्यकर्ते त्याठिकाणी जमन्यास सुरुवात झाली आहे.


                           तर जरांगे यांची प्रकृती खालावल्याची बातमी समजताच. आसपासच्या जिल्ह्यातून छ.संभाजीनगर,जालना या जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते अंतरवली सराटी मध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे त्याठिकाणी आज मोठ्ठ्या प्रमाणात  गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

           राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आणि जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि आज सकाळी भेट देऊन मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.


                        विचारपूस करून त्यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे.राज्यसरकारने आत्ता पर्यंत 4 5 वेळा येऊन भेटून गेले पण आत्तापर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही.जी. आर. दुरुस्त करून  आणण्याचे अर्जुन खोतकर म्हणाले पण अद्याप ते दुरुस्त करून घेऊन आले नाहीत.

                         आत्तापर्यंत गिरीश महाजन, भुमरे,खोतकर असे बरेच मंत्री भेट घेऊन जातात तोडगा कडू म्हणतात पण अद्याप ही कोणता ही तोडगा निघाला नाही.


test banner