मंगळवेढा:जय जवान गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक स्पर्धात्मक असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले यामध्ये 111 महिलांनी नेत्रदान संकल्प केला.
दत्तू-गुंगे गल्लीतील परिसरात स्वच्छता मोहीम राबवून डेंगू मलेरिया प्रतिबंधात्मक पत्रके वाटण्यात आली.
एक घर एक झाड या अंतर्गत मंडळाच्या प्रत्येक सदस्यांना एक रोप भेट देण्यात आले व सेंद्रिय पद्धतीने घरगुती भाजीपाला लागवड कशाप्रकारे करावे याचे मार्गदर्शन कृषीतज्ञ अजय अदाटे यांनी केले.
तसेच रांगोळी,जनरल नॉलेज,चित्रकला,पाककला,संगीत खुर्ची,पारंपारिक वेशभूषा अशा विविध स्पर्धेमधील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
जय जवान गणेशोत्सव मंडळाने डीजे मुक्त व पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे.
सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या गुंगे,कोमल गायकवाड,जस्मीन मुजावर,मनीषा दत्तू,रूपाली कसगावडे,संगीता आवताडे,सोनाली घुले, रंजना पवार, कोमल शिंदे,कल्पना जठार, बबीता पवार,अश्विनी कदम,वर्षारानी मोरे,उज्वला गणेशकर,अर्चना केंदुले,हेमलता नकाते,संगीता घाडगे, सुनिता इंगळे,संगीता शिंदे, लता चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.