श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीत महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय अकलूज येथून सन २००४-२००५ मध्ये बीएडचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बॅचचा स्नेहमेळावा आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
सुरवातीस अक्कलकोट येथील शिवपुरी अध्यात्मिक केंद्रास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यात आले यावेळी अन्नछत्र मंडळाकडून सर्वांना स्वामी समर्थांचे छायाचित्र भेट देण्यात आले. हॅाटेल अजिंक्यतारा मध्ये आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात सुरवातीस
डॉ शिवाजी शिंदे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिवपदी तर धान्नया कौंटगी यांनी देशातील विविध राज्यांच्या सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन विश्वविक्रम केल्याबद्दल बीएड बॅचच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सहभागी मित्रांनी आपला परिचय करून देऊन बीएड मधील अनेक आठवणींना उजाळा दिला तब्बल १९ वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन या गेट टुगेदरमुळे मैत्रीचे नाते अधिक घट्ट झाले आहे.
यावेळी डॉ शिवाजी शिंदे म्हणाले अनेक वर्षांनी सर्वांना भेटल्यामुळे खूप आनंद झाला मी परभणीचा जरी असलो तरी तिथे जेवढे माझे मित्र नाहीत तेवढे जादा मित्र मला सोलापूरात मिळाले आहेत पुढील काळातही आपण सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन हे मैत्रीचे नाते दृढ करण्याचा प्रयत्न करूया असे सांगून शुभेच्छा दिल्या यावेळी येणाऱ्या दिवाळीत अकलूज या ठिकाणी बॅचमधील सर्वच मित्र-मैत्रिणींच्यी उपस्थितीत मोठा स्नेहमेळावा घेण्याचा मानस करण्यात आला यावेळी वारी परिवार निर्मित मंगळवेढे भूमी संतांची हे पुस्तक सर्वांना भेट देण्यात आले सदर स्नेहमेळाव्याप्रसंगी डॉ शिवाजी शिंदे,धान्नया कौटंगी,प्रा विश्वनाथ पवार,इमामकाशिम बागवान,सतिश देशमुख,कुलदीप देशमुख,डॉ आनंद शिंदे,शुभांगी शिंदे,मनिषा शिंदे,रणजित गुठांळ, अमोल यादव,मुकेश सोमवंशी,डॉ महादेव जाधव,जिवराज गरड,जे पी कबाडे,नितीन पतंगे,प्रभानंद पाटील,महेश कोरे,संदिप शिंदे, शिवाजी रानसर्जे, महादेव चौगुले, संदिप गरड, प्रा विनायक कलुबर्मे,प्रा सचिन इंगळे आदीजण उपस्थित होते सदर स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी खेडगी महाविद्यालयाचे प्रा प्रकाश सुरवसे,धान्नया कौंटगी,इमामकाशीम बागवान यांनी खूप परिश्रम घेतले स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक प्रा प्रकाश सुरवसे यांनी केले तर प्रा विनायक कलुबर्मे यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.