श्री संत दामाजी महाविद्यालयात शारीरिक व मानसिक आरोग्य विषयावर समुपदेशन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात शारीरिक व मानसिक आरोग्य विषयावर समुपदेशन.
                       श्री संत दामाजी महाविद्यालयात शारीरिक व मानसिक आरोग्याचे जीवनातील महत्त्व या विषयावर डॉ स्नेहल पवार व डॉ संगीता पाटील यांनी महाविद्यालयातील सर्व मुलींचे समुपदेशन केले सध्य परिस्थितीत मुलींच्या शारिरीक व मानसिक वाढत्या समस्या लक्षात घेऊन तज्ञ डॉक्टरांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थिनींशी संवाद साधताना डॉ स्नेहल पवार म्हणाल्या स्त्रियांना कुटुंबामध्ये आणि नोकरीच्या ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणी शारीरिक व बौद्धिक काम करावे लागते. 


                  त्यावेळी बऱ्याच वेळा स्त्रिया स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे पुढील काळात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते स्वतःच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य आहे का ? शरीरात सातत्याने होत असणारे बदल याकडे त्यांनी बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.

               असुन शंका वाटल्यास तज्ञ डॉक्टरां


चा वेळीच सल्ला घेऊन आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवणे गरजेचे आहे तसेच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य आहाराची अत्यावश्यकता असून तो वेळेवर  घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

                 याप्रसंगी डॉ संगीता पाटील म्हणाल्या या गतिमान व स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच स्पर्धेला तोंड द्यावे लागते त्यातून मोठ्या प्रमाणात ताण-तणाव येत असतो हा ताण पुढे जाऊन अनेक रोगांना निमंत्रण देत असतो.


             त्यामुळे शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज बनलेली आहे त्यासाठी मानसिक तानाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे व त्याच्यावरती मात करून आरोग्यपूर्ण जीवन जगता आले पाहिजे यावेळी मुलींच्या मनातील अनेक शंकांचे निरसन करून समुपदेशन केले सुरवातीस कार्यक्रमाचे उदघाटन डॉ स्नेहल पवार व डॉ संगीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी

              प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,प्रा कविता क्षिरसागर उपस्थित होते

            प्रास्ताविक प्रा सरिता भोसले, सूत्रसंचालन प्रा अर्चना कदम यांनी केले तर आभार प्रा निर्मला सावंत यांनी मानले यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


test banner