शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा माझे छायाचित्र वापरलं तर न्यायालयात जाणार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा माझे छायाचित्र वापरलं तर न्यायालयात जाणार.

 


                महाराष्ट्र:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये उभी फूट पडली असताना अजित पवार यांच्या गटाकडून वारंवार शरद पवार यांचे छायाचित्र वापरले जात आहे. याविरोधात ते न्यायालयात जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

      आपल्या पक्ष चिन्ह याबाबत ही केंद्र सरकार हस्तक्षेप करत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे,निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा असे मत त्यांनी स्व.प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्या श्रद्धांजली सभेसाठी आलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना मत व्यक्त केले.


               पुढे ते असेही म्हणाले की निवडणूक चिन्हामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही. आत्तापर्यंत आपण बैलजोडी,चारखा,गाय-वासरू,पंजा आणि घड्याळ इ. चिन्हांवरती निवडणुका लढवून विजय मिळवला आहे.

          उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याची केवळ चर्चा आहे.केंद्राने १४ ऑगस्ट फाळणी दिन साजरा करून देशात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केला आहे.


         मागणी करण्यासाठी काय लागते?

     माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकत कमी झाली आहे. म्हणून काँग्रेस अधिक जागा लढवेल या वक्तव्याने लक्ष वेधले.


           त्यावरती पवार यांनी मागील लोकसभेत काँग्रेस ने किती जागा जिंकल्या?मागणी करायला काय लागते? असा प्रश्न केला.मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्याच्या निर्णयाला मी केवळ अनुमोदन दिले आहे असेही ते म्हणाले.


test banner