श्री संत विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या मुला-मुलींच्या संघाने दि १४ अॅागस्ट रोजी इंग्लिश स्कूल येथे संपन्न झालेल्या १९ वर्षांखालील तालुकास्तरीय क्रिकेट व बुध्दीबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत
प्रथम क्रमांक मिळवून तालुक्यात अव्वल ठरलेल्या संघातील शुभम मोरे,साहिल हुलजंती,अनिकेत राऊत,यशवंत अवघडे,योगीराज पारेकर,मानव खरबडे,राहुल माने,सार्थक बेंद्रे,विश्वतेज कोंडुभैरी,प्रथमेश मोरे,अविनाश रेवे,सार्थक घंटे,आश्विन माने,शुभम गवळी,सौरभ गायकवाड,सुदर्शन जाधव तसेच मुलींच्या संघातील वैष्णवी बांदल,तनिषा खवतोडे,आयुष्या नांदे,साक्षी शिंदे,शितल मुळीक,प्रणाली गायवाले,नूतन सुळकुंडे,साक्षी ढावरे,माधवी इंगळे,सिद्धी जाधव,मायाक्का भजनावळे,दीक्षा जाधव,पुनम हाके,विद्याश्री चौखंडे,संजीवनी लांडगे प्रणाली हेंबाडे तसेच बुध्दिबळ स्पर्धेत प्रथमेश मोरे याने तालुक्यात प्रथम तर अविनाश रेवे याने तृतीय क्रमांक मिळविला आहे यावेळी सर्व खेळाडूंचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ एन बी पवार व पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सर्व विजेत्या खेळाडूंना प्रा विजय दत्तू व प्रा गणेश जोरवर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सर्व खेळाडूंचे राहुल शहा,बाबासाहेब पाटील,किसन गवळी,ॲड रमेश जोशी,डॉ मोहन कुलकर्णी,डॉ अशोक सुरवसे,यादव आवळेकर यांनी अभिनंदन केले आहे.