श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती रॅली संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती रॅली संपन्न.



      मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने महसूल सप्ताहानिमित्त मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ एन बी पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राचार्य पवार म्हणाले की,शासनाकडून वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे तसेच ग्रामपंचायत,जिल्हा परिषद,लोकसभा,विधानसभा अशा अनेक निवडणुकांमध्ये मतदान करणे हा आपला अधिकार आहे तो समाजातील प्रत्येक व्यक्तीने बजावणे आवश्यक आहे याकरिता जनजागृती होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊनच सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले मतदारांनी मतदान करून योग्य प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत तसेच लोकशाही टिकली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी जागृत असणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. यावेळी 


               आठरा वर्षाचा आकडा पार केला,मतदानाचा हक्क मिळाला,मतांची ताकद ओळखूया, योग्य प्रतिनिधी निवडूया,आपले मत आपले भविष्य,आपले पवित्र मत,करेल लोकशाही मजबूत अशा अनेक घोषणा देऊन जागृती करण्यात आली महाविद्यालयातून प्रस्थान झालेली रॅली बोराळे नाका,  चोखामेळा चौक,मुरलीधर चौक,शिवप्रेमी चौक व दामाजी चौकातील संत दामाजीच्या पुतळ्यास  श्री विद्या विकास मंडळाचे सचिव किसनराव गवळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सांगता करण्यात आली.


                 मतदार जनजागृती रॅली यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा डॉ नवनाथ जगताप, प्रा डॉ दत्तात्रय गायकवाड,प्रा डॉ राजेश गावकरे तसेच कनिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा शैलेश मंगळवेढेकर,प्रा गोविंद गायगोपाळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा डॉ परमेश्वर होनराव तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी रॅलीसाठी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे विशेष सहकार्य लाभले यावेळी महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा डॉ संजय क्षीरसागर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा विनायक कलुबर्मे यांनी केले.


test banner