मंगळवेढा: मंगळवेढा येथील वारी परिवार या सामाजिक संस्थेस वृंदावन फाऊंडेशन व राजमुद्रा संशोधन व विकास केंद्र पुणे यांच्या वतीने २०२३ मधील पर्यावरण रक्षण वृंदावन कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्काराचे वितरण पुण्यातील सदाशिव पेठेतील भाविसा सभागृह येथे ६ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविन्द्र शिंगणापूरकर व वृक्षसेवक हभप शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते व ह भ प माणिकराव मोरे महाराज यांच्या उपस्थितित करण्यात आले.
मंगळवेढा-पंढरपूर हरित पालखी महामार्गावर केलेली वृक्षलागवड व संवर्धन करण्यामध्ये वारी परिवाराचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे तसेच ज्वारी-मका परिषद,कृषी जागर दिंडी, गुटखा-तंबाखू पुड्यांची केलेली होळी,पक्षांना चारा व पाणी यांची केलेली व्यवस्था,जल जागर दिंडी,अशा अनेक पर्यावरण पुरक योगदानाबद्दल वारी परिवारास सदर पुरस्काराने गौरविण्यात आले याअगोदरही सामाजिक कार्याबद्दल वारी परिवारास अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे पुरस्कार स्विकारताना वारी परिवाराचे विलास आवताडे,रामचंद्र दत्तू,सुरेश जोशी,माणिक गुंगे,चंद्रकांत चेळेकर,अजय आदाटे,नाना भगरे, सतिश दत्तू आदीजण उपस्थित होते मिळालेल्या पुरस्काराबद्दल वारी परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.