श्री संत दामाजी महाविद्यालयात नयोमी साटम यांनी साधला युवकांशी संवाद. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात नयोमी साटम यांनी साधला युवकांशी संवाद.




        मंगळवेढा: श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व आय क्यू ए सी यांच्यावतीने मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत आय पी एस अधिकारी नयोमी साटम मॅडम यांनी युवकांशी संवाद साधला.सुरवातीस आय पी एस अधिकारी नयोमी साटम मॅडम,प्राचार्य एन बी पवार यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी साटम मॅडम म्हणाल्या की,यू पी एस सी परीक्षा ही सहज ट्राय करून बघण्याची परीक्षा नाही.


               ध्येय निश्चित करून योग्य दिशेने पूर्ण वेळ झोकून देऊन अभ्यास केल्यास यश नक्की मिळते माध्यमिक शाळेत असतानाच इतर अधिकाऱ्यांना पाहून आपणास अधिकारी व्हायचे आहे हे स्वप्न मी पाहिले आणि वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयपीएस झाले अधिकारी व्हायचे हे निश्चित असल्यामुळे मी विज्ञान शाखेला प्रवेश न घेता,कला शाखेला प्रवेश घेतला इतिहास,भूगोल,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय माझ्या आवडीचे होते मी अर्थशास्त्र विषयातून बी ए ची पदवी संपादन केली पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी झाली महाविद्यालयातील विविध उपक्रमात माझा सक्रिय सहभाग होता महाविद्यालयामध्ये असतानाच मी अधिकाऱ्यांची शिस्त व नीटनेटकेपणा अंगी बाळगली होती. पदवीनंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला मध्येच कोविडचे संकट आले तरीही अभ्यास सुरूच होता तुम्हीही कॉलेज जीवनापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय तुम्हीही यू पी एस सी करू शकता अनेक करिअरच्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत त्या पर्यायांचा शोध घेऊन मार्गक्रमण करा असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


        अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य पवार म्हणाले,नयोमी साटम मॅडमनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा समाज मनावर उमटविला आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे मॅडमनी आपल्या मार्गदर्शनातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांचे ध्येय निश्चित असायला पाहिजे कितीही संकटे आली तरी त्यांना न डगमगता,ध्येयापासून विचलित न होता काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी गुलामगिरीची मानसिकता बदलून आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत साटम मॅडम यांचा आदर्श घेऊन तुम्ही अभ्यास करावा आणि तुमचा सन्मान करण्याची संधी आम्हाला द्यावी अशी अपेक्षाही याप्रसंगी व्यक्त केली.


             हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा डॉ दत्तात्रय गायकवाड,स्पर्धा परीक्षा विभाग व मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख,प्रा डॉ राजेश गावकरे,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा डॉ परमेश्वर होनराव यांनी परिश्रम घेतले.

             याप्रसंगी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ संजय क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रा डॉ नवनाथ जगताप यांनी मानले.



            

test banner