भारताने घडविला इतिहास.चंद्रयान मोहीम फत्ते. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

भारताने घडविला इतिहास.चंद्रयान मोहीम फत्ते.

     


                 भारताने घडविला इतिहास चंद्रयान 3 अंतर्गत इतिहासातील मोठ्ठी,अभिमानाची व भारतीय 140 कोटी आसणाऱ्या जनतेची मान आज गर्वाने व अभिमानाने ताठ झाली आहे.

         चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असून चंद्रावर यशस्वीरीत्या लँडिंग करणारा भारत हा चौथा देश बनला आहे.


       आज प्रत्येक जन इस्रो च्या गौरवाची थाप देत आहे.त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या  शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण भारतासाठी हा क्षण भारतासाठी नवी चेतना ऊर्जा देणारा ठरणारा असल्याचा सांगितलं.


       भारताच्या चंद्रयानाने चांद्राला आलिंगन देत मोहीम फत्ते केली. नंतर  मोदी म्हणाले हा क्षण अविस्मरणीय,अद्भुत आहे. हा क्षण विकसीत भारताचा शंखनादाचा आहे. हा नवीन भारताचा विजय आहे.

        हा क्षण संपूर्ण भारतीयांचा ऊर्जा नवीन चेतना देणारा आहे.पुढे ते म्हणाले की मी ब्रिक्स मध्ये आहे.पण आता प्रत्येक भारती यांसारखे माझं ही मन चंद्रयान 3 मध्ये गुंतले आहे.मी खूप आनंदी आहे.


        पुढे ते असेही म्हणाले की मी इस्रो च्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा देतो आणि 140 कोटी जनतेच आभार मानतो.आपल्या शास्त्रज्ञांचे परिश्रम. खूपच प्रेरणादायी आहे.जिथं कुणीही गेलं नाही तिथं आपण गेलो.

      आता यापुढे चंद्राविषयीच्या अनेक गोष्टी बदलून जातील.याचे कारण भारत आहे.

     ते म्हणाले चंद्राला मामा म्हणातो,चंदा मामा बहुत दूर के हैं,असे म्हटले जायचे. आणि मी खूप आनंदी आहे व सर्वांना शुभेच्छा देतो.



test banner