वारी परिवाराच्या वतीने मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

वारी परिवाराच्या वतीने मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.




      श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा संस्थापक पथरूट गुरुजी यांची जयंती व संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

       त्यामधे क्रीडा स्पर्धा,रांगभरण स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन अशा विविध स्पर्धा व कार्यक्रम पार पडले.


       तर दुसऱ्या दिवशी बक्षिस वितरण समारांभ हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी वारी परिवारास वृक्षमित्र पुरस्कार देण्यात आला.

       वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी वारी परिवाराच्या वृक्षारोपण व संवर्धन कार्याबद्दल वृक्षमित्र पुरस्कार देण्यात आला यावेळी चित्रसेन पाथरुट, नागनाथ पाथरूट,रामचंद्र हेंबाडे वारी परिवाराचे विनायक कलुबरमे,रविकिरण जाधव,चंद्रकांत चेळेकर,स्वप्नील फुगारे,विष्णुपंत भोसले,सतीश दत्तू उपस्थित होते.


test banner