भारतीय पोस्ट ऑफिस घेऊन आली फक्त 299 रुपयात 10 लाख रुपयांचा विमा कवच! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ३० जुलै, २०२२

भारतीय पोस्ट ऑफिस घेऊन आली फक्त 299 रुपयात 10 लाख रुपयांचा विमा कवच!

 


भारतीय पोस्ट ऑफिस एक जबरदस्त विमा योजना घेऊन आली आहे. या विमा योजनेत, लाभार्थीचा 10 लाख रुपयांचा विमा फक्त 299 रुपये आणि  399 रुपयांच्या प्रीमियमसह काढला जाईल.दरवर्षी कालावधी संपल्यानंतर या विम्याचे नूतनीकरण करावे लागेल. यासाठी पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लाभार्थीचे खाते असणे बंधनकारक आहे.

गरिबांसाठी अनेक लाभ :

महागड्या प्रीमियमवर विमा काढू न शकणाऱ्या गरीब वर्गातील लोकांसाठी पोस्ट विभागाने "सुरक्षा का पहला कदम" नावाची विमा योजना आणली आहे. या विमा योजनेत, लाभार्थीचा वर्षभरात फक्त 299 रुपये आणि 399 रुपयांच्या प्रीमियमसह 10 लाख रुपयांचा विमा उतरवला जातो. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी या विम्याचे नूतनीकरण करावे लागते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लाभार्थीचे खाते असणे बंधनकारक आहे.

अपघाती विमा संरक्षण :

या योजनेत आपल्याला बरेच फायदे आहेत. फक्त 299 रुपयांचा विमा काढून आपण अपघाती मृत्यू, कायमचे पूर्ण अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व यावर 10 लाख रुपयांचे संरक्षण कवच प्राप्त करू शकतो. यासोबतच 299 रुपयांच्या या विम्यामध्ये अपघात उपचारासाठी 60,000 रुपयांपर्यंतचा आयपीडी खर्च आणि ओपीडी क्लेममध्ये 30,000 रुपयांपर्यंतचा खर्च उपलब्ध होणार आहे.

विमा संरक्षण कवच :

या योजनेत दोन प्रकार आहेत. 299 रुपये आणि 399 रुपये प्रीमियम. 399 रुपये प्रीमियम विमाचे अनेक फायदे आहेत. फक्त 399 रुपयांच्या प्रीमियममध्ये तुम्हाला अपघाती मृत्यू, कायमचे पूर्ण अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व यावर 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच प्राप्त होईल. तसेच आयपीडी वैद्यकीय खर्च 60,000 रुपयांपर्यंत, आणि अपघाती इजा आणि ओपीडी असा एकूण खर्च 30000, तसेच दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा समावेश या योजनेत केला आहे.

इतर लाभ :

दहा दिवस हॉस्पिटलमध्ये दैनंदिन खर्च 1 हजार रुपये, कुटुंबाचा वाहतूक खर्च 25000 रुपयांपर्यंत, जर दुदैवी मृत्यू झाला तर अंत्यविधीचा खर्च 5000 रुपयांपर्यंत असे विमा संरक्षण प्राप्त होतील. भारतीय पोस्ट विभागाने 30 जून 2022 पासून ही विमा योजना संपूर्ण देशात सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि आपले विमा संरक्षण मिळवण्यासाठी पुढे यावे. असे आवाहन पोस्ट विभागाने केले आहे.

test banner