"जयंत पाटील अवकाळी पावसात भिजले त्यांचा उमेदवार हमखास पडणार"-प्रभाकर भैय्या देशमुख. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

"जयंत पाटील अवकाळी पावसात भिजले त्यांचा उमेदवार हमखास पडणार"-प्रभाकर भैय्या देशमुख.


 पंढरपूर (प्रतिनिधी) अवकाळी पाऊस जसा शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान करतो.तसे नुकसान त्यांच्या पक्षाचा उमेदवार चेअरमन दादा हा हमखास पडणार हे या निसर्गाने दिलेले संकेत आहेत. या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे. असे जनहित संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी सलगर येथील सौ.शैलाताई गोडसे यांच्या प्रचारसभेत आपले मत व्यक्त केले.

         भगिरथ दादा घराचे,जमीनीचे वारसदार होऊ शकतात.परंतु आमदारकी चे वारसदार होऊ शकत नाही. ज्या शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून ऊस पिकवला त्या ऊसाचे बील थकीत ठेवून शेतकऱ्याचे हाल करणारे हे चेअरमन दादा,कामगारांच्या घामाचा पगार त्यांनी कामगारांना दिला नाही.त्या कामगारांच्या लेकरा बाळांची हाय लागणार आहे.अशा उमेदवाराला जनता स्विकारणार नाही.

   ज्या औदुंबर आण्णा पाटील यांनी कारखाना उभा केला.त्यानी कारखान्याचे आणि शेतकऱ्यांचे कल्याण केले.कारखान्याच्या ठेवीवरील व्याजावर कामगारांच्या पगारी होत होत्या त्या कामगारांना आज पगार मिळत नाही. अशी दयनिय अवस्था कामगार,आणि शेतकऱ्यांची आज झाली आहे. कारखाना कर्जात बुडाला आहे. कारखाना विकला तरी कर्ज फिटणार नाही. अशी अवस्था झाली आहे. अन कुठल्या तोंडाने हे चेअरमन जनतेपुढे जाणार आहेत. जनता आता त्यांना स्विकारणार नाही. कितीही मंत्री, आमदार प्रचारसभेत आले तरी त्यांचा पराभव हा निश्चित आहे.

या दादाला कधी जनतेसाठी ,शेतकऱ्यांसाठी अंदोलन करणे जमले नाही. अशा निष्क्रीय नेत्यांना जनता मतदाना च्या रुपाने त्यांचा पराभव करीत असते.या चेअरमन दादाला वडील आमदार असताना साधे जिल्हा परिषद चे सदस्य होता आले नाही.पराभव स्विकारावा लागला.अशी व्यक्ती सहानुभूती च्या लाटेवर आमदार होऊ शकत नाही. आमदार होण्यासाठी शेतकऱ्यांची कामे केली पाहिजे. जनतेच्या प्रश्नाला शासन दरबारी वाचा फोडली पाहिजे. तर जनता डोक्यावर घेते.अशा बिनकामाच्या माणसाला जनता आमदार करत नसते.

    सौ.शैलाताई गोडसे या गेली कित्येक वर्षापासून मंगळवेढ्यातील जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी त्या अंदोलन करीत आहेत.कष्टकरी 

महिलासाठी झटत आहेत. अशा एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे. सौ.शैलाताई गोडसेना एक संधी देऊन विधानसभेत पाठवा.सर्व रखडलेली विकासकामे त्या मार्गी लावल्याशिवाय त्या रहाणार नाही. त्यांचे चिन्ह शिट्टी हे असून शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा.असे आवाहन प्रभाकर भैय्या देशमुख यांनी सलगर खुर्द, सलगर बुद्रुक, येथील प्रचारसभेत मतदारांना केले.

test banner