स्वाभिमानी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर यादव यांचा समाधान आवताडे यांना पाठिंबा! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

स्वाभिमानी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर यादव यांचा समाधान आवताडे यांना पाठिंबा!

 


पंढरपूर(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील, माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील महत्त्वाचे युवा नेता सागर यादव यांनी आपल्या सर्व समर्थकांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत भाजपा व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांना विजयी करण्याचा संकल्प केला. 


याप्रसंगी बोलताना  भाजपाचे खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, "पंढरपूर-मंगळवेढ्यातील सर्व युवा वर्ग सुद्धा भाजपा आणि समाधान आवताडे यांच्या सोबत आहेत. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, आणि पांडुरंग-दामाजी परिवार या सगळ्यांचे सामर्थ्य एकवटल्यामुळे आता या विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा वाहती होईल. 

सागर यादव यांच्या भाजपात सामील होण्याने आता आम्हाला पंढरपूर शहरात अजूनही अधिक आघाडी मिळेल आणि आम्हा सर्वांच्या एकवटणाऱ्या ताकदीने भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता १७ तारखेला कमळ या चिन्हावर होणाऱ्या मतदानात अधिकाधिक भर घालेल.

test banner