सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची "हीच ती वेळ" - देवेंद्र फडणवीस - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची "हीच ती वेळ" - देवेंद्र फडणवीस


मंगळवेढा(प्रतिनिधी) कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून सभा घेण्याची सवय गेली आहे. दुर्देवाने ही पोटनिवडणूक लागली आहे. एका मतदारसंघाची ही पोटनिवडणूक असली तरी सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची ही संधी मतदारांना मिळाली आहे.असे सांगतानाच देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व्यक्त केले .   पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ते मंगळवेढा येथे बोलत होते.                                         यावेळी व्यासपीठावर खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खा. रणजीत नाईक निंबाळकर,आ.प्रशांत परिचारक, आ.गोपीचंद पडळकर,आ. विजयकुमार देशमुख, आ.सचिन कल्याणशेट्टी,आ.राम सातपुते,आ.सुभाष देशमुख, जयकुमार गोरे,पाशाभाई पटेल,माजी मंत्री अनिल बोंडे, हर्षवर्धन पाटील,सदाभाऊ खोत,राम शिंदे,लक्ष्मण ढोबळे, बाळा बेगडे,चित्रा वाघ,श्रीकांत देशमुख,शशिकांत चव्हाण,बी.पी रोंगे,भाजपा तालुकाध्क्षय गौरीशंकर बुरकुल, प्रदीप खांडेकर,दिपक माने,चंद्रकांत पळवळे, विजय बुरकूल,सुनिल सर्वगौड,गोपाळ भगरे, माऊली हळणवर,बापुसाहेब मेटकरी रासपचे दामाजी मेटकरी आदीसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.                                                       यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील रखडलेल्या पाणी योजनेसाठी मोदी सरकारने पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे तर तुमच्या योजनेसाठी तुम्ही समाधान दादाला संधी दिल्यानंतर समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी विनंती केल्यानंतर व त्यांच्याबरोबर आम्ही विनंती केल्यानंतर मोदी सरकारकडून आम्ही या योजनेसाठी थेट निधी उपलब्ध करून देऊ त्यासाठी तुम्ही अन्यायी अत्याचारी दुराचारी सरकार त्याची जागा दाखवून देण्यासाठी उद्याच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांना विजयी करावे कोरोणाच्या संकटात सभा घेण्याची आमची इच्छा नव्हती परंतु विरोधी पक्षाचे नेते येऊन आमच्यावर मुक्ताफळे उधळून गेले आहेत त्यामुळे आम्हाला सभा घेण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता शेतकऱ्यांना गोरगरीब सामान्य जनतेला मदत करायला शेतकऱ्याकडे पैसे नाहीत सरकारकडे पैसे नाहीत मात्र मुंबईतील बिल्डर यांना मदत करण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.दारू विक्रेत्यांना सवलत देण्यात आली विज बिल वसुलीसाठी आम्ही विरोध केला असता वीज बिल तोडली जाणार असे सांगितले परंतु कोराना च्या संकटात शेतकऱ्याकडून जवळपास पाच हजार कोटींची वीज बिले वसूल केले आहेत त्यामुळे या महावसुली सरकारचे मधील मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. मुंबई पोलीस दलाची बदनामी काही पोलिस अधिकाऱ्यांनी केली. कोरोनाच्या संकटात राष्ट्रवादीच्या नेत्याकडे रेमडेसिव्हीरचा साठा कुठून उपलब्ध झाला असा प्रश्न उपस्थित केला.


येत्या 2 मे रोजी पंढरपूर मंगळवेढा निकाल लागेल. त्याच दिवशी बंगाल आणि आसामचाही निकाल लागणार आहे. त्यावेळी देशामध्ये सर्वांनाच धक्का बसेल, तसाच धक्का महाविकास आघाडी सरकारलाही बसणार आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.


यावेळी उमेदवार समाधान आवताडे बोलताना म्हणाले की,ही निवडणूक विधानसभेची निवडणूक आहे, पण विकासाच्या मुद्द्यावर विरोधक बोलताना दिसत नाहीत, विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून ते कारखान्यातील बाबत  बोलत आहे.या मतदारसंघात विरोधकांनी कोणती विकासाची कामे केली ते सांगावे.पराभव समोर दिसू लागल्याने विरोधक दामाजीच्या सभासदांवर बोलत आहेत अफवा पसरवत आहेत.पण  दामाजीच्या एकाही सभासदाचे सदस्यत्व रद्द होणार नसल्याचे  राज्याच्या विरोधी पक्षनेते फडणवीस साहेबां समोर मी आज तुम्हाला शब्द देतो.कारखानाचा मोबदला सर्व सभासद घेत आहेत मग सभासत्व रद्द कसे होईल असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

विठ्ठल कारखान्यावर 600 कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे.ऊस मागणाऱ्या शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे पाप त्यांनी केले आहे. बारामती उपसा सिंचन योजनेला तुम्ही निधी देताय मग 35 गावाला का निधी दिला नाही. विरोधकांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले पण या काळात कोणती विकास कामे केली आहेत ते सांगावे असा प्रश्न विचारला आहे.

आ.प्रशांत परिचारक म्हणाले की, आजपर्यंत विरोधकांनी येथील जनतेला खोटी आश्वासने देऊन निवडून आले होते. अनेक अपप्रचार करून मते मिळवली.

मी आणि समाधान आवताडे आम्ही दोघांनी केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ही निवडणूक राज्याची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक आहे.

35 गावाच्या पाणी प्रश्नावर प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी आश्वासने दिली आहेत, पण कालच्या आर्थिक तरतूदमध्ये यासाठी निधी का उपलब्ध केला नाही. तुम्हाला चाळीस वर्षानंतर मंगळवेढा भुमीतला आमदार करण्याची संधी आहे. विरोधक म्हणतील हे फुटलय ते फुटलय असे काही फुटले नाही अफवा वर विश्वास ठेवू नका तुम्ही समाधान आवताडे यांना मतदान रुपी अर्शिवाद द्या आम्ही पढंरपुर मधून गुलल घेऊन येतो हेच स्व.सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले.

test banner