आईच्या प्रचाराची धुरा; ऋतुजा गोडसे हिच्या झंझावत प्रचाराची मतदारसंघात चर्चा - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

आईच्या प्रचाराची धुरा; ऋतुजा गोडसे हिच्या झंझावत प्रचाराची मतदारसंघात चर्चा

 अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांची मुलगी ऋतुजा गोडसे वडीलधाऱ्या मतदारांपुढे नतमस्तक होऊन मतदान करण्याचे आवाहन करीत असल्याचे छायाचित्र.


मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शैलाताई गोडसे या निवडणूक अपक्ष लढवीत आहेत. कोणताही मोठा राजकीय पक्ष नाही किंवा स्टार प्रचारक सुद्धा नाही. स्वतः शैला गोडसे आणि जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख हे दोघे सध्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांचा प्रचार उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, आमदार, खासदार, राज्यभरातील नामांकित स्टार प्रचारक हे प्रचारासाठी येत आहेत. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याचा एकत्रित असणारा हा मतदारसंघ मोठा आहे, त्यामुळे आपली आई शैला गोडसे प्रचारात एकटी पडू नये म्हणून त्यांची मुलगी ऋतुजा गोडसे ही मतदारसंघात सर्व सामान्यांपर्यंत पोहोचत शैला गोडसे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहे. अगदी आपल्या आईप्रमाणेच न दमता न थकता ऋतुजा व तिच्यासोबत असणारे तिचे मित्र व मैत्रिणी कोणत्याही गावात गेल्यानंतर अगदी कोठेही चौकात, हॉटेलात, पारावर बसलेल्या वृद्ध, तरुण, महिला सर्वच मतदारांना शैला गोडसे त्यांचे चिन्ह समजावून सांगत आहेत व मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. तसेच ऋतुजा गोडसे हिच्या प्रचाराच्या झंझावाताची मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. युवक मतदारांना नम्रपणे तर वडीलधाऱ्या मतदारांना नतमस्तक होऊन ऋतुजा आपल्या आईला विजयी करण्याचे आवाहन करीत असल्यामुळे तिच्या या प्रचाराची सध्या मतदारसंघात चर्चा होत 


test banner