आपल्या कवितेतून आठवले यांनी सुचक इशारा "निवडणुकीची तारिख आहे सतरा आणि राष्ट्रवादीला आहे खतरा"
मंगळवेढा(प्रतिनिधी)"मजबुत होणार आहेत आपले वाडे... कारण निवडून येणार आहेत समाधान आवताडे!"असे म्हणत आज मंगळवेढ्यातल्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. आपलं अपयश जनतेवर ढकलत शिवराय-भीमराय यांच्या महाराष्ट्राची बदनाम करणाऱ्यांनी राजीनामा देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ते आज मंगळवेढा दौऱ्यावर आले होते त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख ,अनुसूचित जाती जमातीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी आ.सुधाकर भालेराव,अण्णाभाऊ साठे महामंडळ माजी अध्यक्ष व भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, आर.पी.आयचे संघटक दीपक चंदनशिवे, प्रदेश महामंत्री सचिन आरडे, प्रदेश सचिव संजीव खिलारे, पंढरपूरचे माजी सभापती श्रीमंत मस्के, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी,भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरुकुल, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत,संचालक सचिन शिवशरण,शहराध्यक्ष गोपाळ भगरे,विजय बुरकुल, बाबा कोंडुभैरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की सध्या पोलीस अधिकारी आपल्या जीवाचे बाजी लावत कोरोनाशी लढताना अठरा-अठरा तास सेवा करीत आहेत पण ज्या गोष्टी आंतकवादी करतो त्या गोष्टी काही पोलीस अधिकाय्राने केल्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होऊ लागली आहे त्यामुळे महाराष्ट्राचे तोंड काळे झाले.शिवराय व भिमरायाचा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अधिक बदनामी झाल्याने जर सत्ता चालवता येत नसेल तर सत्ता सोडा.सध्या एका बाजूला कोरोनाशी लढायचा आहे तर दुसर्या बाजूला आपणाला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा देखील सामना करायचा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे. महिलांवरील अन्याय थांबला पाहिजे. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी करणारा रिपब्लिकन पक्ष आहे, जो देशात भारतीय जनता पार्टी सोबत आहे. हे लक्षात ठेवूनच येत्या १७ तारखेला…"देवेंद्र सरकारचे दिवस आठवायचे आहे, कमळाला विधानसभेत पाठवायचे आहे असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.शेवटी निवडणुकीची तारिख आहे सतरा आणि राष्ट्रवादीला आहे खतरा ही कविता करून त्यांनी भाषणाचा शेवट केला. उमेदवार समाधान आवताडे बोलताना म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरी विरोधात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ही निवडणूक आहे.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे आज त्या विषयावर काहीच बोलत नाहीत, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आजपर्यंत या प्रश्नावर नुसती आश्वासने या जनतेने ऐकली आहेत.आता सुधारणा होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यामाध्यमातून अनेक गोरगरीब शेतकरी सामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. अनेक योजना राबविल्या आहेत.कोरोनाच्या काळात महिला वर्गाला,शेतकऱ्यांना व बेरोजगार तरुणांना काम मिळवून देण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.