राहुल शहा यांचे कट्टर समर्थक ज्ञानेश्वर कोंडूभैरी भाजपात दाखल - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ११ एप्रिल, २०२१

राहुल शहा यांचे कट्टर समर्थक ज्ञानेश्वर कोंडूभैरी भाजपात दाखल

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे हे रविवारी तळसंगी गावात प्रचार घेत होते त्याचवेळी मंगळवेढ्याच्या रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांचे कट्टर समर्थक मंगळवेढा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ  अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडूभैरी यांनी   समाधान आवताडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप मध्ये प्रवेश केला.  यावेळी कोंडूभैरी यांचे शेकडो समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर हा भाजप प्रवेश झाल्याने राहूल शहा गटाला मोठा धक्का समजला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या दौऱ्यात राहुल शहा यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा घेतला होता.

भाजप प्रवेशानंतर ज्ञानेश्वर कोंडूभैरी म्हणाले, समाधान आवताडे हे निश्चित निवडून येणार या विजयात आपला वाटा असावा हा माझा प्रामाणिक उद्देश आहे, शहराचा, मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी हा पाठिंबा दिलाय. मंगळवेढा शहरात राजकारण वेगळ्या दिशेने चालले आहे,  चार वर्षे विरोध करतात शेवटचे सहा महिने एकत्र येऊन काम न करता पैसे खातात, मात्र आम्ही जेव्हा शहराच्या प्रश्नावर आंदोलन, उपोषण करतो तेव्हा समाधान आवताडे यांचा पाठिंबा असतो.

test banner