ही निवडणूक माजलेले साखर सम्राट विरुद्ध शेतकरी-रविकांत तुपकर - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

ही निवडणूक माजलेले साखर सम्राट विरुद्ध शेतकरी-रविकांत तुपकर


मंंगळवेढा(प्रतिनिधी) अन्याय करणाऱ्यांचे मुस्काट फोडा अशी शिकवण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. दिगवंत आमदार भारत भालके यांना राजू शेट्टी यांनी पाहिली उमेदवारी दिली होती. माजलेले साखर सम्राट विरुद्ध शेतकरी अशी ही निवडणूक आहे.त्यामुळे जनतेने योग्य उमेदवार कोण आहे ते ओळखून मत द्यावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केली.                                                                                                                               ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथील आठवडा बाजार येथे आयोजित सभेत बोलत होते.

व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी, श्रीमंत कोकाटे, उमेदवार सचिन शिंदे, दत्तात्रय गणपाटील,अँड.राहुल घुले, दामाजी कारखान्याचे माजी संचालक श्रीधर खांडेकर,श्रीमंत केदार, संदीप कारंडे,बीड पंचायत समितीच्या सदस्या पूजा मोरे,विठ्ठल कारखान्याचे संचालक बागल,राजाराम सावंत,दयानंद पाटील, संजय बेडे,हर्षद डोरले यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना तुपकर म्हणाले,प्रेमापोटी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचाराला आले आहेत अशा भ्रमात राहू नका,ते विठ्ठल साखर कारखाना हडप करण्यासाठी आले आहेत. विठ्ठल साखर कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत त्यानी आंदोलने केली म्हणून त्यांना तुरंगात टाकले. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर हा राजू शेट्टी यांच्यामुळे दिला जात आहे.पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकता येत नाहीत.ही जनता त्यांना योग्य जागा दाखवून देईल , हवा वरून कुणाची ही दिसत असेल पण खरी हवा तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. भगीरथ भालके यांनी शेतकऱ्यांची 46 कोटी एफ आर पी आणली पण बिल अदा न करता स्वतःसाठी ठेवले निवडणूक लढवत आहेत.2009 साली दिगंवत आमदार भारत भालके यांनी सांगितले होते, राजा का बेटा राजा नाही होता, जो काबिल है वही हाकदार बनेगा मग आता ही घराणेशाही कशासाठी असा सवाल त्यांनी केला.

उमेदवार सचिन शिंदे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूर मध्ये नव्या परिवर्तनाची लाट आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ता आल्यानंतर अनेक घोषणा केलेल्या होत्या त्यातील एकही घोषणा यांनी पूर्ण केली नाही.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार होता, पीक कर्ज देणार होते, पीक शेतात असताना लाईट कट करण्याचे पाप यांनी केले आहे. गोरगरिब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. लॉक डाउन काळात शेतकऱ्यांना, महिलांना एका रुपयाची ही मदत केली नाही.विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी शेतकऱ्यांचे बिल दिले नाही जनता त्यांना पाडल्या शिवाय राहणार नाही. कामगारांच्या पगारी दिल्या नाहीत, ऊसाची देणी त्या मगच मत मागाला या अशी भूमिका घेतली.

आमदार पुत्र हे वारसा हक्क सांगून आमदारकी मागत आहेत.त्यांनी शेतकरी व गरीब लोकांसाठी काय काम केले शेतकऱ्यांना लुटण्याचे काम यांनी केले आहे. 19 हजार शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न केला तो आम्ही हाणून पाडला आहे.त्यामुळे त्यांचे सभासदत्व कायम राहणार आहे.35 गावचे पाणी म्हणजे निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला झाला आहे. आजपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीने तेथील जनतेला फसवले आहे. ज्या बारामती करांनी तुमचे पाणी चोरले आहे तेच आज इथे येऊन पाणी देतो म्हणतात ते पाणी काय देणार नाहीत म्हणून नागरिकांनी त्यांना घरी बसवावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

test banner