महाराष्ट्र दिनापासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

महाराष्ट्र दिनापासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस

 


मुंबई(प्रतिनिधी) देशभरात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच या विषाणूला आळा घालण्यासाठी करोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे. दि. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र शासनानाने घेतला आहे.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात करोनाला रोखण्यासाठी आघाडीवर राहून लढणाऱ्या करोना योद्ध्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. त्यानंतर ४५ वर्षावरील वयाचे नागरीक आणि रक्तदाब, मधुमेह अथवा अन्य सहाव्याधी असलेल्या रुग्णांना ही लस देण्यात येत आहे. आता महाराष्ट्र दिनापासून देशभरात प्रत्येक सज्ञान नागरिकाला प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे.   संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात तरुण वर्गाला या विषाणूने लक्ष्य केले असून लसीकरणाची वयोमर्यादा ४५ वरून २५ वर्षांवर आणावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली होती. या मागणीला प्रतिसाद देऊन १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला, त्यासाठी प्रधानमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि त्यासाठी लसीचा पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.                                     रेजिस्ट्रेशन कसे कराल

- सर्वात प्रथम cowin.gov.in या वेबसाईटला भेट द्या

- येथे आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर भरा

- तुम्हाला ओटीपी मोबाईलवर मिळेल, नंबर टाकून रेजिस्ट्रेशन करा

-रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लसीकरणासाठी दिवस आणि वेळ ठरवू शकता

- हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही लस घेऊ शकता.

-यावेळी तुम्हाली रेफ्रन्स आयडी मिळेल, याच्या माध्यमातून तुम्हाला लस सर्टिफिकेट मिळू शकते.

रेजिस्ट्रेशनच्यावेळी तुमच्याकडे खालीलपैकी एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे

- आधारकार्ड

-पॅनकार्ड

-मतदानकार्ड

-ड्रायव्हिंग लायसेन्स

-हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड

-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीम रोजगार कार्ड

-पासपोर्ट

-बँक/पोस्ट ऑफिसकडून जारी करण्यात आलेले पासबुक

-पेन्शन डॉक्युमेंट

- सर्विस आयडेन्टी कार्ड (केंद्रीय/राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेले)

test banner