पायाखालची वाळू सरकल्यामुळेच मंत्र्यांना व भाजपच्या नेत्यांना गावोगावी फिरण्याची वेळ - शैलाताई गोडसे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ११ एप्रिल, २०२१

पायाखालची वाळू सरकल्यामुळेच मंत्र्यांना व भाजपच्या नेत्यांना गावोगावी फिरण्याची वेळ - शैलाताई गोडसे


 मंगळवेढा (प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत प्रचार करताना मंत्र्यांना व भाजपच्या नेत्यांना जनतेच्या मनातील प्रक्षोभ लक्षात आला असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकु लागली आहे. त्यामुळेच महाविकासआघाडी सरकारचे मंत्री आणि भाजपचे मोठमोठे स्टार प्रचारक गावोगावी वाड्या-वस्त्यांवर फिरत आहेत. असा उपरोधिक टोला जनहित शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार करताना लगावला आहे. यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख हे उपस्थित होते.

गोडसे पुढे म्हणाल्या, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील मतदार हा राज्यातील सर्वात संवेदनशील मतदार म्हणून ओळखला जातो. आणि या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या वतीने जे कारखानदार उमेदवार उभारले आहेत. त्यांचा इतिहास पाहता या मतदारसंघातील नागरिक त्यांना मतदान देण्याच्या मनस्थितीत नाही. राष्ट्रवादीचे मंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक हे मतदारसंघात आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरताना त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे. त्यामुळे हे सर्व मंत्री आणि नेते गावोगावी, वाड्यावस्त्यांवर तसेच घर-घर फिरत आहेत. निवडणुका आल्यानंतर गावोगाव किंवा घरोघरी फिरणारे नेते आणि आपल्या सुखा दुखात नेहमी सहभागी होणारी शैला गोडसे यांच्यातील फरक हा मतदारांच्या लक्षात आला असल्यामुळे यावेळी या मतदारसंघातील मतदार हे भाकरी पलटविण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत माझा विजय निश्चित होणार आहे असेही बोलताना यावेळी गोष्टी म्हणाल्या.test banner