पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक ही लढत चौरंगी होणार! शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी उतरणार मैदानात! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २३ मार्च, २०२१

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक ही लढत चौरंगी होणार! शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी उतरणार मैदानात!

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) कोणत्याही चर्चा गजावाजा न करत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक भारतीय जनता पक्षाने लढविण्याची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात सक्षम व प्रभावी उमेदवार म्हणून भाजपडून विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचाकांचे नाव जवळपास निश्चित असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

राष्ट्रवादीने दिवगंत आमदार भारत भालकेंचे पुत्र भगिरथ भालके यांचे नाव जवळपास निश्चित असल्यामुळे त्यांनी मतदारसंघात गाठीभेटीवर जोर देत आपल्या प्रचारांची सुरूवात केली आहे.श्री संत दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे अपक्ष म्हणून पुन्हा आपले नशीब अजमावण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उभारणार आहेत.तसेच महाविकास आघाडीतुन बाहेर पडत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ही निवडणूक लढण्यावर ठाम असून यासाठी मंगळवेढ्यातून अॕड. राहुल घुले व जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांची नावे असून ही पोटनिवडणुक परिचारक-भालके-आवताडे व स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी चौरंगी लढत जवळपास निश्चित मानली जात आहे.

पोटनिवडणुकीसाठी आजपासून (ता.23 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यापूर्वीच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीच्या संदर्भाने हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता.19 मार्च) कार्यकर्त्यांची बैठक घेवून उमेदवारी संदर्भात प्राथमिक चाचपणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून भगिरथ भालकेंना उमेदवारी मिळेल असे स्पष्ट संकेत अजितदादाच्या बोलण्यातून दिसून आले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या भाजपच्या गोठातही आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. सुरुवातीला परिचारक निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र, कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावामुळे अखेर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. याच संदर्भात रविवारी (ता.20 मार्च) परिचारक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक देखील झाली. त्यामध्ये परिचारकांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर परिचारकांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपच्या संपर्कात असलेल्या समाधान आवताडे यांनाही आता अपक्ष निवडणुक लढवण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे यांनी आमदार भारत भालके, परिचारक यांच्या विरोधात चांगली लढत दिली होती. मंगळवेढा तालुक्यातून समाधान आवताडे यांना दोन्ही उमेदवारांपेक्षा पाच हजार मते अधिक मिळाली होती. त्यामुळे आवताडे यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. समाधान आवताडे हे अपक्ष निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. भाजपाला सध्या हा मतदारसंघ मागच्या वेळे पेक्षा अनुकूल वाटत असल्याचे कार्यकर्ते कडुन बोलले जात आहे.कारण परिचारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने  झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत पंढरपूर शहर आणि तालुक्यातील अनेक समस्या दुर करत लोक मनामध्ये पुन्हा एकदा घर निर्माण करत प्रत्येकाच्या सुख दुःखत समावून गेले आहेत. त्यासाठी सध्या तरी परिचारक यांना ही पोटनिवडणुक अनुकूल असून भाजपाची राज्यातील संपूर्ण टिम त्यांच्या सोबत असणार त्यामुळे त्यांची बाजु भक्कम समजले जात आहे.                                                  दरम्यान भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीतील नाराज कार्यकर्ते बरोबर,महाविकास आघाडीतील धुसफूस देखील  समोर असून शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे व स्वभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु शेट्टी यांनी लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे भगीरथ भालके समोर भरपूर अडचणी निर्माण झाले आहेत यातून ते नानाची रणनिती वापरून कसे मार्ग काढत यशस्वी होतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.       

 


test banner