भगीरथ (दादा) भालके यांनी नेतृत्व व पालकत्व स्विकारण्यासाठी पदाधिकारी, सहकारी,कार्यकर्ते व जन सामान्यांच्या कडून वाढता दबाव - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

भगीरथ (दादा) भालके यांनी नेतृत्व व पालकत्व स्विकारण्यासाठी पदाधिकारी, सहकारी,कार्यकर्ते व जन सामान्यांच्या कडून वाढता दबावमंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार स्व.भारत (नाना) भालके साहेबांच्या अकाली निधनाने मंगळवेढा तालुक्यातील पोरके झालेल्या हजारो समर्थकांनी गुरूवार दि.3 डिसेंबर रोजी सरकोली येथे जाऊन कै.भालके साहेबांच्या प्रतिमेसमोर आदरणीय  नाना नंतर त्यांचे पुत्र व विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ (दादा) भालके हेच आमचे नेते असून त्यांनी आमचे नेतृत्व व पालकत्व स्वीकारण्याची गळ घातली.....

 भरलेल्या अश्रुंनी व गहीवरलेल्या अवस्थेत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करीत आ.भालके साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला कै.भालके साहेबांचे पुत्र यांना आम्ही योग्य वेळी न्याय देऊ असे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सूचित केले असल्याने त्यांच्याकडेच येथील नेतृत्व दिले जाणार आहे. भगीरथ दादांनी देखील नानांच्या मदतीने गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा चांगल्या पद्धतीने हाताळत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे संचालक पदाचा अनुभव, मृदू परंतु प्रसंगी आक्रमकपणा ,उत्तम वक्तृत्व , सर्व सामान्यांच्या समस्यांची असलेली जाण ती सोडवण्यासाठी असलेली धडपड,सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव, युवकांचे असलेले संघटन , स्वताःचा जनसंपर्क,यामुळे त्यांनी आपले  मतदारसंघात वेगळे स्थान निर्माण केले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा