मोबाईल-शाप की वरदान? - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

मोबाईल-शाप की वरदान?


एवढी सवय झालीये या मोबाईल ची आपल्याला. पण हा शाप आहे की वरदान हाही एक सवाल आहे!
मोबाईल मुले आपल्याला दूरदूर पर्यंत संवाद साधता येतो. त्यासाठी प्रवास करावा लागत नाही. ताबडतोब प्रत्युत्तर मिळते. नातेवाईकांना संदेश पाठवता येतो. इंटरनेट वर सर्व माहिती उपलब्ध असते, मोबाईल च्या साहाय्याने ती उपभोगता येते. आजकालच्या मोबाईल मध्ये तर फोटो आणि व्हिडिओ काढण्याची देखील सोय आहे. आज मोबाईल वर बस/रेल्वे/विमान तिकीट बुक करता येतात, टीव्ही चा रिचार्ज करता येतो, एका क्षणात कुणाला पैसे पाठवता येतात. यापैकी काहीही करता आले नसते. अशा प्रकारे हा मोबाईल हे एक वरदानच वाटतो.
पण नीट विचार केला की समजेल ह्या मोबाईल चे तोटे. त्यामुळे लोकांचा प्रात्यक्षिक संबंध कमी होतो. आताच्या व्हाट्सएपच्या जगात कुणि कुणाला शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर निघत नाही. मानसिक भावनांचा अभाव दिसतो. या मोबाईलचे आरोग्यावर परिणाम होतात. दृष्टी कमी होते. मोबाईलच्या नादात आपण अनेक सुखमय क्षणांना मुकतो. हा तर एक शापच झाला की!

एकूण मोबाईल एका मर्यादेत वापरला असता तो वरदान आणि अधिक वापर करता शाप असेच म्हणावे लागेल.
test banner