संगांनाकाचा इतिहास - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

संगांनाकाचा इतिहास



संगणक (काँप्युटर) हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया ,सांखिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे. बहुतांश आधुनिक संगणक हे डिजिटल (Digital) स्वरुपातील माहिती हाताळतात.


संगणकविज्ञान हि एक इलेक्ट्रोनिक शाखा आहे. कठीणता विश्लेषणांचा (complexity analysis) अभ्यास हे ह्या शाखेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय नवीननवीन तर्कशुद्ध रिती (algorithms) शोधून काढणे हे ह्या शाखेचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे. आजकाल डेटाबेसेस (Databases) , क्रिप्टोग्राफि (Cryptograpy), नेट्वर्किंग (networking), इमेज प्रोसेसिंग (Image Processing) इत्यादी क्षेत्रात बरेच संगणकशास्त्रज्ञ काम करत असतात.

संगणकाचे प्रकार

१) सुपर कोम्प्युटर :
 सुपर कॉम्प्युटर संगणकामध्ये इतर संगणकातुन एकत्र केलेल्या माहितीवर अतिशय वेगाने आकडेमोड किंवा प्रक्रिया घडवून आणली जाते. यामध्ये अधिक प्रोसेसर्स बसवलेले असतात व प्रत्येक प्रोसेसरकडे एक एक काम सोपविलेले असते. आपल्या मेंदूप्रमाणेच हे प्रोसेसर्स समांतर कार्य करू शकतात. अनेक प्रोसेसर्स एकत्रितरित्या काम करत असल्याने काम अतिशय वेगाने होते. या संगणकाची क्षमता फ्लॉप (Floating Point Operations per Second) या एककात मोजली जाते. सुपर कॉम्प्युटरमधील चिप ही गॅलियम अर्सनाइडची बनविलेली असते व ती सिलिकॉन चिपपेक्षा सहापट वेगाने काम करू शकते. सुपर कॉम्प्युटरची स्मरणशक्ती खूपच जास्त असल्याने ज्ञानाचे विशाल भंडार यात सामावलेले असते.:

२) मेन फ्रेम कॉम्प्युटर:
मेनफ्रेम कॉम्प्युटर आकाराने खूपच मोठे असतात. एखाद्या मोठ्या खोलीत मावतील एवढे. हे संगणक अतिशय वेगाने माहितीवर प्रक्रिया घडवून आणतात. एका सेकंदात किती सूचनांवर प्रक्रिया घडवून आणल्या जातात त्यावर यांची गतिमानता / क्षमता ठरवली जाते. महाग असूनही हे संगणक वापरले जातात कारण याची माहिती साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. टेल्कोसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये तसेच विद्यापीठ, रेल्वे आरक्षण इ. ठिकाणी मेनफ्रेम कॉम्प्युटर वापरला जातो. 

३) मिनी कॉम्प्युटर :
१९६० नंतर या प्रकारचे संगणक विकसित झाले. त्या काळातील इतर संगणकापेक्षा हे संगणक आकाराने लहान होते व त्याची गती व क्षमताही कमी होती. म्हणून त्यांना मिनी कॉम्प्युटर हे नाव दिले गेले. यावर अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे काम करू शकत. सध्या या प्रकारचे संगणक फारसे अस्तित्वात नाहीत.
४) मायक्रो कॉम्प्युटर / पर्सेनल कॉम्प्युटर - १९८१ मध्ये IBM या कंपनीने सर्वप्रथम घर, कार्यालये व शाळा या ठिकाणी वापरता येतील असा छोटेखानी कॉम्प्युटर बाजारात आणला. या प्रकारचे संगणक व्यक्तिगत उपयोगासाठीच तयार केले गेले. यात एका छोट्याशा। चिपवर प्रक्रियेसाठी लागणारे सर्व प्रोसेसर्स बसवलेले असतात. त्यामुळे हे संगणक आकाराने अर्थातच लहान असतात. म्हणून यास मायक्रो काम्प्युटर म्हणतात
५) लॅपटॉप व पामटॉप हेही मायक्रो कॉम्प्युटरचेच प्रकार होत.
    1. लॅपटॉप म्हणजे एका छोट्या ब्रिफकेसमध्ये मावणारा पर्सनल कॉम्प्युटर ब्रिफकेसप्रमाणेच हा कुठेही नेता येतो किंवा मांडीवर ठेवून काम करता येते. ऑफीसपासून दूर किंवा बाहेरगावी काम करण्यासाठी लॅपटॉप वापरला जातो. उदा. आय बी एम थिंक पैड.
    2. पामटॉप संगणकाचे उदाहरण म्हणजे डिजिटल डायरी व कॅलक्युलेटर प्रमाणेच हातात मावणारे हे छोटे संगणक. फोन नंबर्स किवा पतं साठवून ठेवण्यासाठी या प्रकारची डायरी वापरली जाते.

test banner