पाणी असेल तर मातीत सुध्दा सोनं पिकवण्याची धमक मंगळवेढ्याच्या शेतक-यांमध्ये : समाधान आवताडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

पाणी असेल तर मातीत सुध्दा सोनं पिकवण्याची धमक मंगळवेढ्याच्या शेतक-यांमध्ये : समाधान आवताडे


       
                                                          मंगळवेढा(प्रतिनिधी )शेतीला पाणी असेल तर इथल्या मातीत सुध्द्दा सोनं पिकवण्याची धमक इथल्या शेतक-यांमध्ये आहे. परंतु पाण्यासाठी कायम झुलवत ठेवण्याचेच काम आजपर्यंत झाले आहे. जनतेला अशा प्रकारे फसविले गेले की जणू कांही लोकप्रतिनिधी पुढे आले आणि मागे पाण्याचा लोंढा आला. दुष्काळात रहायचं, दुष्काळात जगायचं हे आपल्या अंगवळणी पडलेलं आहे. अजून आपण दुष्काळातच मरायचं का...प्रत्येक कुठुंबप्रमुखाला वाटते, माझ्या वारसाने प्रगती करुन स्वताच्या पायावर उभे राहून प्रगती करावी, परंतु शेती करावी म्हटलं तर पाणी नाही, नोकरी करावी म्हटलं तर नोकरीची संधी नाही, उद्योग करायचा म्हटलं तर उद्योग व्यवसाय नाही। अशी विदारक परिस्थिती मतदारसंघाची करुन ठेवलेली आहे. ऊस तोडणी करणा-या मजूराच्या  मुलानेही ऊस तोडणीच करायची का असा प्रश्न उपस्थित करत समाधान आवताडे यांनी

उपस्थित करत अकोला,शेलेवाडी,गणेशवाडी,कचरेवाडी,खडकी,महमदाबाद हू.,लोणार,  पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, हून्नूर, भोसे, नंदेश्वर या गावचा प्रचारदौरा केला यावेळी संबोधीत करताना उमेदवार समाधान आवताडे बोलत होते .


पुढे बोलताना आवताडे म्हणाले की,चांगले शिक्षण घेवून चांगली नोकरी मिळावी हे स्वप्न मुलांनी बाळगू नये का?  यासाठीच हे चित्र बदलण्याची वेळ आता आली आहे. मतदानाचे दिवस कमी राहिले आहेत, आपले वेगवेगळे ग्रुप करा, वाड्यावस्त्यावर फिरुन जनजागृती करुन परिवर्तन होणे किती गरजेचे आहे याविषयी जनजागृती करा असे आवाहन उमेदवार समाधान आवताडे यांनी शेवटी केले.
या प्रचार दौ-याच्या प्रसंगी प्रा.येताळा भगत सर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकल्याण सभापती शिला शिवशरण आणि पंचायत समिती सभापती प्रदिप खांडेकर यांनी जिल्हयात जास्तीत जास्त निधी या मतदारसंघासाठी आणला आहे. तेल धोंडा,दोड्डा नाला,चाळीस धोंडा म्हणत आज धोंडा गुळगुळीत झाला पण पाण्याचा पत्ता नाही. परंतु आता परिवर्तनाचे वारे वहाते आहे. पंढरपूर तालुक्यातील जनता म्हणते आहे, इकडची काळजी करु नका तुम्ही फक्त मंगळवेढयाची काळजी करा. मंगळवेढयातील जनता म्हणते इथली काळजी करु नका ,तुम्ही पंढरपूर तालुका बघा. इतका उस्फूर्तपणा आहे. माणूस बदलला की विचार बदलतो,विचार बदलला की विकास होत असतो. यासाठीच सक्षम आणि समर्थ नेतृत्व समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभे रहाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन येताळा भगत सर यांनी केले.


या प्रचार दौ-याप्रसंगी मार्केट कमेटीचे सभापती सोमनाथ आवताडे,दत्तात्रय जमदाडे सर, संचालक सचिन शिवशरण,संचालक लक्ष्मण नरूटे, पंचायत समिती माजी उपसभापती शिवाजी पटाप,प्रा।समाधान क्षिरसागर, डॉ.लक्ष्मण हेंबाडे,संतोष मिसाळ सर, रंगनाथ काळुंगे, अमीत यादव, शिवाजी जाधव, डाù।गेजगे,भाऊसो आवताडे आदीनीही आपले मनोगत केले. या प्रचार जिल्हा परिषद सदस्य दिलीप चव्हाण, दौ-यात दामाजी कारखान्याचे संचालक सुरेश भाकरे, बाळासो शिंदे, बसवेश्वर पाटील,चंद्रभागा कारखान्याचे माजी संचालक सुभाषभाऊ यादव, डॉ.लक्ष्मण हेबाडे, हरळीकर आदिसह सखाराम बेलदार, अशोक घोडके, उत्तम बेलदार, पप्पू कोळेकर, तुकाराम कोळेकर, महादेव आवताडे, सहदेव देवकर, बाजीराव गवळी, ईश्वर जाधव गुरुजी, दामोदर जाधव गुरुजी,तात्यासो अनुसे,जोतीराम चव्हाण, गणेश चव्हाण,पांडूरंग चव्हाण,सोमनाथ चव्हाण,सदाशिव पाटील,निवृत्ती कटरे, दत्तात्रय मळगे,भाऊसो गावडे,शिवाजी शिंदे, कोंडीबा पडोळकर,हरीबा वाघमोडे,बिरा झंजे,अर्जून कोंडूभैरी, बंडू जगताप, भैरु भोसले, दगडू सुतार, प्रताप सुर्यवंशी, सहदेव लवटे, डॉ.घाडगे,किरण औताडे,उत्तम चोपडे यांचेसह संबंधीत गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन,सदस्य,पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.

चौकटीत घेणे-
उमेदवार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अपंग संघटणेने समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा दिला. प्रथमेश गाडवे, सिध्देश्वर पाटील, सुधीर हजारे, नागेश मुदगूल, राजेंद्र सावंत, गणेश मुढे, नवनाथ कोंडूभैरी, अनिल घोडमिसे, नवनाथ मासाळ, अतुल जाधव, प्रसाद कसबे, बंडू लोहार, शिवाजी सोलनकर, धोंडीबा शिंदे, अशोक आवताडे, बाळू जावळे, संगीता सलगर आदिंनी पाठींबा जाहीर केला. तसेच जेष्ठ नागरीक व विधवा संघटणेनेही जाहीर पाठिंबा व्यक्त केला. तसेच बोराळे येथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश गोरे, राजकुमार बनसोडे आदिनीही समाधान आवताडे गटात प्रवेश करुन जाहीर पाठिंबा दिला.

test banner