दुष्काळी पस्तीस गावांना पाणी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही - आ.भारत भालके - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

दुष्काळी पस्तीस गावांना पाणी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही - आ.भारत भालके


मंगळवेढा (प्रतिनिधी)विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष भरून निघाल्याशिवाय राज्यात कोणत्याही नवीन योजनेला मंजुरी मिळणार नाही असे असताना देखील  मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील दुष्काळी पस्तीस गावांसाठी असणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अतिशय पोटतिडकीने प्रयत्न करून मंजुरी मिळविली. सत्ताधारी पक्षाने माझे प्रयत्न कितीही हाणून पाडण्याचा प्रयत्न केला तरीही मी दुष्काळी 35 गावांना पाणी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असे प्रतिपादन आमदार भारत भालके यांनी नंदेश्वर येथे आयोजित प्रचारसभेत केले.
   यावेळी पांडुरंग चौगुले, ज्येष्ठ नेते भिवा दोलतडे, माजी सरपंच गेणा दोलतडे, दादासाहेब मदने, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग दोलतडे, आप्पासाहेब मेटकरी, बलभीम कांबळे, उपसरपंच राहुल कसबे, जयसिंग कांबळे, माजी उपसरपंच अंकुश कांबळे, विश्वास कांबळे हे यावेळी उपस्थित होते.
आमदार भालके पुढे बोलताना म्हणाले, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील दुष्काळी गावांच्या योजनेची आजपर्यंत सत्ताधार्‍यांनी टिंगल केली आहे. याच्याही पुढे जाऊन या योजनेसाठी दोन टी.एम.सी. पाणी मंजूर असताना यातील एक टीएमसी पाणी कमी करून जवळपास पंधरा गावे या योजनेमधून कमी केली आहेत. पण मी हे होऊ देणार नाही यासाठी आमचा न्यायालयीन लढा सुरू आहे. ज्येष्ठ नेते भिवा दोलतडे व पांडुरंग चौगुले यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी आभार माझी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग दोलतडे यांनी मानले.

चौकट
नंदेश्वरचे माजी सरपंच गेणा दोलतडे, उपसरपंच राहुल कसबे, माजी उपसरपंच किसन कळकुंबे, माजी उपसरपंच अंकुश कांबळे व विश्वास कांबळे यांचेसह नंदेश्वर गावातील  दोलतडे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार भारत भालके यांना जाहीर पाठिंबा देताना राष्ट्रवादीत प्रवेश केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा