स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून द्या- उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून द्या- उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी

     
                                                          मंगळवेढा(प्रतिनिधी ) राज्यात पुन्हा भाजपाचे केंद्रातील सत्तेप्रमाणे राज्यातही भाजपाचे सरकार येणार असल्यामुळे रखडलेल्या इथल्या स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून द्यावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केले.
      भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रयत क्रांती, रिपाई,महासंग्राम मित्रपक्षांचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यातील हुलजंती व बोराळे येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी आ. प्रशांत परिचारक,चरणू काका पाटील,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पक्षनेते नितीन पाटील, रयत क्रांती चे राज्याचे नेते दीपक भोसले विश्रांती भुसनर शिवानंद पाटील शशिकांत चव्हाण भारत पाटील धनाजी गडदे
आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना ते म्हणाले की या मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार निवडून देऊन या तालुक्याचा विकास होणार आहे का असा सवाल करत
या मतदारसंघाच्या समस्या सोडण्यासाठी वयाने ज्येष्ठ असलेले निष्कलंक ब्रह्मचारी संत रूपाने लाभलेल सुधाकरपंत परिचारक यांना विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे राज्यात येणाऱ्या सत्तेमुळे रखडलेल्या प्रश्नाला तेच न्याय देऊ शकतात म्हणून त्यांना निवडून द्यावे.
test banner