पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात चौरंगी लढत निश्चित; भालके, परिचारक, अवताडे,कांळुगे यांच्यासह २० उमेदवार रिंगणात - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात चौरंगी लढत निश्चित; भालके, परिचारक, अवताडे,कांळुगे यांच्यासह २० उमेदवार रिंगणात


   
                                                                       मंगळवेढा (प्रतिनिधी) पंढरपूर विधानसभा मतदासंघात २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत तिरंगी होणार असल्याचे दिसते. शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनी माघार घेतली तर काँग्रेसच्या शिवाजी काळूंगे यांचा  उमेदवारी अर्ज राहिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके, भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक आणि अपक्ष उमेदवार समाधान अवताडे यांच्यातच निवडणूक रंगणार असले तरी कॉग्रेसचे शिवाजीराव कांळुगे यांची उमेदवारी आ.भारत भालके यांना  डोकेदुखी ठरणार आहे.
दरम्यान, आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठीछाननीत एकूण २८ उमेदवारांचे ४० अर्ज वैध ठरविण्यात आले होते.उमेदवारी अर्ज मागेघेण्यासाठी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अवधी देण्यात आला होता. सोमवारी सतिश अशोक पाटील (संघर्ष सेना), रामचंद्र नाना परचंडे (अपक्ष), अकुंश महादेव शेंबडे (अपक्ष), गोडसे शैला धनंजय (अपक्ष), सोनकांबळे लक्ष्मण शंकर (अपक्ष), जुबेर लतिफ बागवान (अपक्ष), आप्पासाहेब दामोदर भोसले (अपक्ष) तसेच अनिल दत्तात्रय बोदाडे (अपक्ष) या आठ उमेदवारांनी आपलेउमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २० उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्यामध्येभारततुकाराम भालके (राष्ट्रवादी काँग्रेस), शिवाजीराव बाजीराव काळुंगे (इंदिरा कॉग्रेस), सारिका रविंद्र सर्वगोड (बहुजन समाज पार्टी), सुधाकर रामचंद्र परिचारक (भारतीय जनता पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महा पार्टी), ॲड. मारुती कृष्णा अवचारे (बहुजन विकास आघाडी), दत्तात्रय तात्या खडतरे (वंचित बहुजन आघाडी) यांच्याशिवाय अपक्ष म्हणून सुदर्शन रायचंद खंदारे, हनुमंत विठ्ठल बिराजदार, माने संतोष महादेव, प्रताप पांडूरंग कांबळे, ॲड. लोकरे शिवलाल कृष्णा, प्रा. नामदेव शेकाप्पा थोरबोले पाटील, निशिकांत बंडू पाटील, अब्दुलरऊफ जाफर मुलाणी, आवताडे समाधान महादेव, बिराप्पा मधुकर मोटे, सुनिल सुरेश गोरे, आण्णासो सुखदेव मस्के तसेच बिराप्पा ईश्वर वाघमोडे हे उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी यावेळी दिली.
मतदान सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणार असून, मतमोजणी गुरुवार दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ रोजी होणार असल्याचेहीनिवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनीयावेळी सांगितले.

test banner